
कोल्हापूर: कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन अविरत कार्यरत आहे. कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर तर कोरोना संशयित कोणी असेल तर त्याला लवकरात लवकर शोधणे व त्याची तपासणी आणि उपचार करणे महत्वाचे आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना क्वारंटाईन केल्याने भविष्यात होणारा प्रसार टाळता येतो. हे लक्षात घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार विविध साध्या प्रश्नांचा समावेश असणारा एक ऑनलाईन फॉर्म तयार केला आहे.वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा फॉर्म बनवलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना सदृश्य रुग्णाची संख्या कळण्यास मदत होणार आहे. त्याबरोबर एखाद्या व्यक्तीला काही लक्षणे दिसल्यास त्याने हा फॉर्म भरला तर ही व्यक्ती बाधित आहे की नाही हे प्रशासनाला कळू शकते .त्यासाठी फॉर्म भरणाऱ्या व्यक्तीने काळजीपूर्वक हा फॉइम भरावा असे अपेक्षित आहे .
कोल्हापूर जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातून जवळपास ७५,००० लोक आलेले आहेत. या सर्वांनाच १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यास सांगितले आहेच. मात्र, या सर्वांपर्यंत पोहोचुन त्यांची सतत माहिती घेणे व यातील कोणाला काही लक्षणे दिसल्यास त्यावर लगेच पुढील वैद्यकिय कारवाई करणे गरजेचे आहे. यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला चॅटबॉट मदतीला येत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन व आय सी एम आर यांच्या गाईडलाईन नुसार बनवलेला हा चॅटबॉट युजरला विविध प्रश्न विचारतो . हे समजते.या प्रश्नांमध्ये आपण ।गेल्या महिनाभरात परदेश प्रवास केला आहे का ? आपण परदेश प्रवास केलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला आहात का ? आपण कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आला आहात का ?आपण पुणे, मुंबई किंवा बाहेरून जिल्यात आला आहात का ? आपल्याला ताप, कोरडा खोकला, सर्दी, अंगदुखी यापैकी कोणते लक्षण जाणवते का ? आपल्याला मधुमेह , उच्च रक्तदाब, श्वसन त्रास असा कोणता आजार आहे का ? असे प्रश्न या फॉर्म मध्ये आहेत . एखाद्या व्यक्तीने हा फॉर्म भरून सबमिट केल्यावर याबाबत त्या व्यक्तीला रिझल्ट काळात नाही.पण यावरून प्रशासनाला ती व्यक्ती हाय, मिडीयम वा लो रिस्क मध्ये आहे, याची माहिती तात्काळ उपलब्ध होते.
जिल्हा प्रशासन त्या त्या तालुक्यातील अथवा नगरपरिषदेतील यंत्रणेला ती माहिती देते . यानंतर जे लोक हाय अथवा मीडियम रिस्क मध्ये आहेत त्या लोकांपर्यंत शासकीय यंत्रणा पोहोचून त्याची तपासणी केली जाते. गेल्या २ दिवसात या बॉट वर जवळपास १२ हजारांहून अधिक लोकांनी आपली माहिती नोंदवली आहे. आरोग्य विभागाने त्यानुसार कार्यवाही देखील केली आहे.
सीपीसी अनलिटीक्स या डेटा अनलिटिक्स क्षेत्रातील जगविख्यात व वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनशी थेट संबंधित कंपनीच्या मदतीने हा बॉट बनवण्यात आला आहे.
तसेक्सह बऱ्याच वेळा ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसली की लोक घाबरून जात आहेत.पण त्यांनी घाबरून न जाता या फॉर्म मधील माहिती अचूक भरली तर याबद्दलची माहिती प्रशासनला कळते आणि जर काही अडचण असेल तर प्रशासन त्या व्यक्तीला संपर्क करते .
त्यामुळे जर कोल्हापूर बाहेर कोठूनही आला असेल (लक्षणे असोत वा नसोत) किंवा जर आपल्याला कोणतीही लक्षणे दिसत असतील तर http://www.kolhapurcollector.com/covid19 या लिंक वर जाऊन आपली माहिती नक्की भरावी जेणेकरून प्रशासनाला सहकार्य होईल व आपली देखील योग्य ती काळजी घेतली जाईल, असे आवाहन प्रशासनाने केले आहे .
Leave a Reply