
कोविड -१९ मुळे सध्याच्या लॉकडाउनच्या परिस्थितीत नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने नागरिकांना डिजिटल पेमेंटद्वारे सुरक्षित व्यवहार करण्याबाबतचे प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. यासाठी सध्या सुरू असलेल्या ‘यूपीआय चलेगा’ मोहिमेतील श्रीमती राव या लोकप्रिय पात्राची मदत घेऊन नागरिकांना डिजिटल पेमेंटबद्दल साक्षर केले जात आहे.
सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत डिजिटल पेमेंटद्वारे सुरक्षित व्यवहार करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी एपीसीएलने सध्या ‘इंडियन पे सेफ या सुरू असलेल्या अभियानाअंतर्गत ‘यूपीआय चलेगा ’ही मोहिम सुरू केल्याचे म्हटले आहे.
डिजिटल पेमेंटसंदर्भात आवश्यक जागरूकता निर्माण करण्यासाठी एनपीसीआयने धोरणात्मकरित्या ‘यूपीआय चलेगा’ मोहिमेसाठी नायिका श्रीमती राव यांना आणले आहे. श्रीमती राव यांच्या वैशिष्ट्यीकृत व्हिडिओंच्या 6 भागांमधून फोन रिचार्ज, मनी ट्रान्सफर, किराणा आणि मेडिकल स्टोअरची देयक भरणा, कर्मचार्यांचा पगार यासारख्या अत्यावश्यक सेवांसाठी यूपीआयचा वापर स्पष्ट करण्याचे प्रशिक्षण एनपीसीएल देत आहे. यशिवाय भीम यूपीआय अॅपचा वापर करून नागरिकांना पंतप्रधान केअर फंडामध्ये देणगी द्यावी असे आवाहनही केले आहे.
सामाजिक अंतर कायम ठेवणे महत्त्वाचे आहे यावर भर देत श्रीमती राव यांनी त्यांच्या या व्हिडिओंमधून लॉकडाऊन दरम्यान नागरिकांनी घरी राहून डिजिटल पद्धतीने व्यवहार करानेत याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे. सद्याच्या परिस्थितीत सर्वत्र पोहोचण्यासाठी तसेच लोकांना प्रभावित करण्यासाठी एनपीसीआय सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म अशां सर्वांचा वापर केला आहे. यूपीआय चलेगा डॉट कॉम ही लघुस्थळावर (मायक्रोसाईट) वर यूपीआय सुरक्षितपणे कसे वापरावे याबद्दल सर्व उपयुक्त माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ट्विटर, फेसबुक आणि लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील मोहिमेमध्ये “पेमेंट करना है, डिजिटल करो” या संदेशाद्वारे जनजागृती केली जात आहे. उद्योग क्षेत्रातील लोक, सरकारी विभाग आणि नागरिकांचा सहभाग यात वाढविल्याचे दिसत आहे. नागरिक स्वतःचे व्हिडिओ बनवून तसेच कधी मित्रांसोबत तर कधी सहकारी, किंवा कुटूंबासह व्हिडिओ बनवून डिजिटल व्यवहाराद्वारे सुरक्षित कसे राहता येईल याचा संदेश पसरवत आहेत. या संदेशासाठी # इंडिया पे सेफ # इंडिया स्टे # यूपीआयचलेगा हे हॅशटॅग वापरले जात आहे. “सध्याच्या परिस्थितीत आम्ही सर्व नागरिकांनी घरीच राहून सामाजिक अंतर पाळावेत असे आवाहन करत आहोत. आम्हाला आशा आहे की, आमच्या यूपीआय चलेगा’ या मोहिमेद्वारे # इंडिया पे सेफ अंतर्गत नागरिकांना त्यांच्या रोख पैसे देण्याच्या सवयीत बदल करून डिजिटल पेमेंटचा वापर करून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न सूरू करतील. # इंडिया पे सेफ हा संदेश प्रत्येक घरात नेण्यासाठी सहकार्य करणा-या प्रत्येकाचे आम्ही आभार मानत आहोत. कुटूंब व मित्रांपर्यंत हा संदेश पोहोचविण्यात अधिकाधिक लोकांना त्यांची भूमिका निभावण्यास प्रोत्साहित करा. ” असे एनपीसीआयच्या सीओओ प्रविणा राय म्हणाल्या.
” सध्याच्या लॉकडाउन कालावधीत बँका आणि इकोसिस्टम भागीदारांसह, मजबूत डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकास मदत करण्यास एनपीसीआय तयार आणि वचनबद्ध आहे,” असेही श्रीमती राव म्हणाल्या.
पेमेंट इकोसिस्टम प्लेयर्सच्या सहकार्याने, एनपीसीएलने उद्योगांसाठी सोपे, सुरक्षित आणि तात्काळ देयक असे यूपीआय चलेगा हे जाहिरात अभियान तयार केले आहे. यूपीआयच्या योग्य वापरासाठी वापरकर्त्यांना मार्गदर्शन करणे आणि रोजच्या जीवनात बदल घडवून त्यांच्या जीवनमानात यूपीआयचा वापर आणणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे. यूपीआय सक्षम अॅप्सवर व्यवहार करताना या मोहिमेमध्ये सुरक्षा बाबींवरही भर देण्यात आला आहे. मोहिमेची क्रिएटिव्ह एजन्सी ओगल्वी एण्ड मॅथेर (ओ एन्ड एम) यांनी श्रीमती राव हे कॅरेक्टर साकारले आहे. यूपीआय ब्रँडचे त्या मुखपत्र बनल्या आहेत.एनपीसीआयचे फ्लॅगशिप उत्पादन यूपीआय वापरकर्त्यांना एका बँक खात्याचा तपशील दुसरीकडे न सांगता अधिकाधिक बँक खात्यात रिअल-टाइम आधारावर पैसे हस्तांतरित करण्याची परवानगी देते. सोपी, सुरक्षित, कमी प्रभावी मोबाइल आधारित पेमेंट सिस्टम डिजिटल पेमेंटचा एक प्रमुख प्रकार बनला आहे. अधिक माहितीसाठी कृपया www.UPIChalega.com वर भेट द्या.
Leave a Reply