
कोल्हापूर: सर्व होमिओपॅथिक डॉक्टर्स, महालक्ष्मी डिस्ट्रीब्युटर्सच्या सहाय्याने आमदार चंद्रकांत जाधव यांनी महापालिकेच्या माध्यमातून ‘चला वाढवूया रोगप्रतिकारक शक्ती’ ही मोहीम सुरू केली आहे. जिल्हा माहिती कार्यालय आणि विभागीय माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अल्बम-30 सी या होमिओपॅथी औषधाचे वाटप करण्यात आले.यावेळी पत्रकार राजा मकोटे, बाबासाहेब खाडे, सचिन पायमल, अजित आयरेकर यांनी याचे वाटप केले. आमदार चंद्रकांत जाधव यांनी महानगरपालिकेचा आरोग्य विभाग, आशा वर्कर, स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, महिला बचत गट यांच्या माध्यमातून 35 हजार कुटूंबांना आर्सेनिक अल्बम 30 सी या होमिओपॅथी औषधांबरोबर माहिती पत्रकाचेही वाटप केले असल्याचे श्री. पायमल आणि श्री. मकोटे यांनी सांगितले.
Leave a Reply