
कागल:कागल कोविड केअर सेंटरसाठी येथील मुस्लीम समाजांतर्गत बैतूलमाल समितीच्यावतीने पाच ऑक्सीजन मशीन व अडीच हजार मास्क देणार असल्याची माहिती समाजाच्या प्रतिनिधीनी दिली. समाजाच्यावतीने हे पत्र कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांच्याकडे देण्यात आले. श्री माने यांनी समाजाच्या या निर्णयाचे राष्ट्रनिर्माणातील योगदानाबद्दल कौतुक केले. महिन्यापूर्वीच कागलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले आहे . या रुग्णालयासाठी प्रत्येकी 50 हजार किंमतीचे असे अडीच लाखांची पाच ऑक्सिजन यंत्रे व अडीच हजार कागल मुस्लिम समाज व बैतुलमाल समितीच्यावतीने दिले जाणार आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांनी ही माहिती त्यांना दिली.यावेळी समाजाचे जमीर नाईक, निहाल जमादार, अय्याज मुजावर, इक्बाल काझी, असिफ मुजावर, नासिर सुतार, मुस्ताक मुल्ला आदींसह प्रतिनिधी उपस्थित होते.तसेच प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसिलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव, तालुका आरोग्य अधिकारी जुवेकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply