रंकाळा परिसरातील कदम खणीचे पाणी चॅनेलच्या माध्यमातून बाहेर काढा :आमदार चंद्रकांत जाधव

 

कोल्हापूर : रंकाळा तलाव परिसरातील कदम खणीचे पाणी चॅनेलच्या माध्यमातून बाहेर काढा, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी केली.प्रभाग क्रमांक ५६ मधील राजकपूर यांच्या पुतळ्याशेजारी असणाऱ्या कदम खण येथे सध्या कचरा टाकल्याने पाणी तुंबले आहे. परिणामी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर शेजारील घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. या अनुषंगे आमदार जाधव आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी  परिसराला आज भेट दिली. तेथील नागरिकांशी चर्चा करून उपाययोजनेसंदर्भात माहिती घेतली.दरम्यान, नगरसेवक महेश सावंत यांनी येथे चॅनेल बांधण्याची मागणी केली. त्यावर आमदार जाधव यांनी तात्पुरती चाच मारून पाण्याची निर्गत करण्याची व नंतर चॅनेल बांधून देण्याची सूचना आयुक्तांना केली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश म्हसकर, जल अभियंता भास्कर कुंभार, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!