
कोल्हापूर : बजाज फायनान्स लिमिटेड (बीएफएल)च्या वतीने देण्यात येणारा मोराटोरियम: 31 मार्च 2020 पासून न चुकवलेल्या ईएमआयकरिता पात्र ग्राहकांना एक ते सहा ह्फ्त्यांवर ही सुविधा मिळू शकते, त्यासाठी पुढील प्रमाणे निकषांची पूर्तता करावी लागेल: ग्राहकांचा कर्ज परतफेडीचा रेकॉर्ड विनाखंड असावा ,असे ग्राहक ज्यांच्या कोणत्याही कर्जांचे 2 पेक्षा अधिक ईएमआय प्रलंबित नसतील, आणि ग्राहकांनी बीएफएलकडे मोराटोरियमबाबत विनंती केलेली असावी (स्वयंचलित नव्हे). 29 फेब्रुवारी 2020 रोजी ग्राहकांची एनपीए नसलेली खाती (जसे की, नव्वद (90) दिवस ओव्हरड्यू) , मोराटोरियम मंजुरीचा निर्णय हा संपूर्णपणे बीएफएलच्या अखत्यारीत असेल.ग्राहक https://customer-login.bajajfinserv.in/Customer?Source=Raise या लिंकवर जाऊ शकतात आणि तिथे त्यांनी स्वत:ची ओळख पटवावी. ही ओळख निश्चित केल्यानंतर ग्राहकांनी ‘raise a request section’ वर जाऊन प्रोडक्ट ड्रॉपडाऊनखाली कोविड – 19 ची निवड करावी, कर्जाविषयीची माहिती निवडून अटी आणि शर्थी काळजीपूर्वक वाचा. अटी आणि शर्थी स्वीकारल्यानंतर मोराटोरियमचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना विनंती करता येईल. बँक खात्यातून ईएमआय डेबिट होण्यापूर्वी किमान 7 दिवस अगोदर ग्राहकांनी ही विनंती नोंदवणे गरजेचे राहील.
मोराटोरियमचा लाभ घेतल्यास : कर्जफेडीचा कालावधी वाढू शकतो किंवा समान कालावधी राखल्यास ईएमआयच्या रकमेत वाढ होऊ शकते, मोराटोरियम कालावधीत कर्जावरील व्याज (इंटरेस्ट ऑन लोन) हे देय व्याज (इंटरेस्ट पेयेबल) आणि प्रिन्सिपल आऊटस्टॅडिंगमध्ये जमा होईल, मोराटोरियम कालावधीतील ग्राहकोपयोगी वस्तूंवरील कर्जावर देखील व्याज लागू होणार आहे.
तुमच्या विनंतीची स्थिती: एक्सपेरीया पोर्टलवरील “check status of your request” वर क्लिक करून मोराटोरियमची तपासणी करता येईल. तुमची विनंती रद्द झाल्यास बीएफएल तुमच्याशी संपर्क साधेल.
अफवा / खोटी माहिती: काही बेईमान व्यक्ती अफवा पसरवत आहेत की: आरबीआयकडून जारी मार्गदर्शक तत्त्वानुसार , मोराटोरियम स्वयंचलित पद्धतीने उपलब्ध आहे, कोणताही ईएमआय बँकेत जमा करू नये, कोणताही इंटरेस्ट /व्याज लागू होणार नाही / शुल्क वसुली करण्यात येणार नाही; बँकाकडून आकारण्यात येणारा ईएमआय मँडेट बाउन्स चार्ज बीएफएलला जमा केला जातो; आणि सर्व ग्राहकांना ईएमआय मँडेट देण्यात आला आहे.
सत्य जाणून घ्या: आरबीआयने : एनबीएफसींना परवानगी दिली आहे, मात्र सर्व ग्राहकांना स्वयंचलित मोराटोरियम अनिवार्य केलेला नाही , ज्या ग्राहकांनी मोराटोरियम पर्याय निवडलेला नाही, त्यांच्याकरिता ईएमआयच्या बँकिंगची मर्यादा नाही ; मुदतीचे कर्ज आणि खेळते भांडवल असल्यास त्यावर कॉन्ट्रॅक्च्युअल रेट ऑफ इंटरेस्ट लागू होईल. मुदतीचे कर्ज असल्यास बाकी असलेल्या मुदत कर्जावर व्याज लागू असेल. खेळते भांडवल असल्यास मोराटोरियम कालावधी पूर्ण झाल्यावर चुकते न झालेले व्याज वसूल करण्यात येणार आहे. ईएमआय मँडेट बाउन्स चार्ज बँकेकडून वसूल केला जातो आहे आणि हे शुल्क बीएफएलकडे जमा करण्यात येत नाही. ईएमआय मँडेट सादर करण्यात आला आहे, मात्र ज्या ग्राहकांनी त्याची निवड केलेली नाही किंवा जिथे मोराटोरियम विनंती रद्दबादल ठरवण्यात आली तिथे तो लागू नाही.
Leave a Reply