
कोल्हापूर : शिवसेना नेते, युवा सेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री नामदार मा.आदित्यजी ठाकरे साहेबांचा येत्या १३ जून रोजी वाढदिवस साजरा होत आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यावरण मंत्री नामदार श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांना पर्यावरण पूरक शुभेच्छा देण्यासाठी कोल्हापूर शहर शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने “जन्मदिनी वृक्ष लावू प्रत्त्येकानी” अशा वृक्षारोपणाच्या संकल्पाचे आयोजन करण्यात आले असून, आपल्या लाडक्या नेतृत्वाला शुभेच्छा देण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक आणि युवासैनिकांनी वृक्षारोपण करावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
पर्यावरण मंत्री नामदार आदित्य ठाकरे याांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवार दि.१३ जून २०२० रोजी सकाळी १० वाजता प्रस्तावित असलेले “हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान, नागाळा पार्क, येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शिवसेना आणि युवासेनेतर्फे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
Leave a Reply