त्या गाडीची पाठवणी करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ झाले भावूक.

 

कोल्हापूर:अखंड दहा वर्ष साथ दिलेल्या त्या गाडीची पाठवणी करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ भावुक झाले. गेल्या दहा वर्षातील अनेक निवडणुका, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची निर्मिती आणि विविध सामाजिक विधायक उपक्रमात यशस्वी म्हणून ओळख ठरलेली ही गाडी आहे फॉर्च्यूनर क्रमांक एम एच ०९ : सी पी ९०० . गाडी बदलायची असल्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यानी या जुन्या गाडीला पुष्पहार अर्पण करून सद्गदित भावनेने तिला निरोप दिला.दहा वर्षात भरपूर वापर झाल्याने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही गाडी बदलण्याचा आग्रह चिरंजीव नवीद यानी धरला होता. परंतु; गेल्या दहा वर्षात प्रत्येक निवडणुकीत याच गाडीने यश दिल्याचे सांगत मंत्री मुश्रीफ यांनी तो निर्णय थांबविला होता. कारण, गेल्या पाच वर्षांचा विरोधी आमदारपदाचा काळही या गाडीने अनुभवला होता. त्याआधीच्या पाच वर्षांचा मंत्रिपदाचा रुबाबही या गाडीने अनुभवला होता. मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित प्रसंग कोणताही असो. मग तो सुखाचा असो, दुःखाचा असो की संघर्षाचा…… गाडी नंबर ९०० आणि चालक अजित सदैव सेवेसाठी तत्पर असायचा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!