
कागल :ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नाभिक समाजाला धान्य वाटप झाले. पुणे येथील नंदादीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. निता ढमाले यांच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील गरजु लोकांना तसेच हातावरचे पोट असणाऱ्यांना धान्य दिले आहे.
कागल येथे नाभिक समाजातील १०० गरजु कुटुंबाना तसेच बारा- बलुतेदार यांनाही जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात आले.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया बाबा माने, नगरसेवक नितीन दिंडे, अशोक सातुसे, रणजीत बन्ने, बच्चन कांबळे व नाभिक समाजातील प्रमुख उपस्थित होते.
Leave a Reply