
कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री. दत्त तरुण मंडळ सरनाईक कॉलनी शिवाजी पेठ आणि जी.पी.ए असोसिएशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आणि कोव्हीड १९ विषाणू प्रतिबंध होमिओपॅथी मेडिसीन वाटप करण्यात आले.तसेच भागातील नागरिकांची तपासणी करण्यात आली .या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार, श्री. विजय देवणे, जी.पी. ए.अध्यक्ष डॉ.शिरीष पाटील,सचिव डॉ.अरुण धुमाळे, सदस्य डॉ.संदीप पाटील, डॉ.राजेश कागले, डॉ.शिवराज जितकर, श्री. दत्त तरुण मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक श्री. दत्ताजी टीपुगडे व सदस्य, शाहू ब्लड बँकेचे डॉ. व स्टाफ , परिसरातील नागरिक हजर होते.
श्संजय पवार,डॉ.शिरीष पाटील, डॉ.संदीप पाटील, यांनी आपल्या भाषणात रक्तदान, कोव्हींड १९, प्रतिबंध उपाय याबाबत माहिती दिली. डॉ.शिरीष पाटील यांनी होमिओपॅथीक औषध दिले.
भागातील ८० नागरिकांची तपासणी करून मार्गदर्शन व उपचार केले.
Leave a Reply