
कोल्हापूर:कळंबा जेल परिसरात विजय चंदर भोसले हा मोठ्या रक्कमेवर तीन पाणी जुगार घेत असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून जुगार घेणाऱ्या विजय भोसले याच्यासह जुगार खेळणारे कासिम मुल्ला, परशुराम कांबळे, सचिन हेगडे, सूर्यकांत चौगुले, आजर फकीर, रोहित नलगे, रुपेश माने, सुरेश कुऱ्हाडे, राकेश चौगुले, मोहन सिद्धगणेश, अजित गायकवाड, अहमद मुल्ला, बकशु मंगळवेडे, वसंत पुजारी, सागर कांबळे, सतीश जगदाळे, समीर बागवान विजय साठे या 19 जणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून रोख रक्कमेसह, मोबाईल संच, जुगाराचे साहित्य, पाच मोटरसायकली असा एकूण 7 लाख 79 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच पोलिसांनी विजय भोसले यांच्या घरावर छापा टाकून विनापरवाना बाळगलेली हत्यारे जप्त केली यामध्ये चार तलवारी दोन एडके एक कोयता ही हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. सदरची कारवाई जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील, सहाय्यक फौजदार विजय कोळी, पोलीस कर्मचारी अनिल ढवळे, रमेश डोईफोडे, प्रकाश संकपाळ, योगेश गोसावी, सचिन देसाई, संदीप बेंद्रे, शाहू तळेकर, परशुराम गुजरे, प्रदीप पाटील, रुपेश कुंभार, इरफान गडकरी, पोलीस नाईक सोनाली कोल्हे पाटील, सचिन ढोबळे , अनील भांगरे यांनी केली.
Leave a Reply