देशी आणि काबुली चण्यांवर वेबिनारचे आयोजन

 

पुणे (प्रतिनिधी) : देशी आणि काबुली चण्यांवर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक चण्यांच्या व्यासपीठावर ऑस्ट्रेलिया आणि रशिया यांच्यादरम्यान एक आश्चर्यकारक स्पर्धा निर्माण झाली असून काबुली चणे उत्पादन आणि वापराच्या संदर्भात मध्यवर्ती स्थान पटकावतील तसेच , काबुलीचण्यांनी भारतातील डाळींच्या क्रांतीला प्रत्यक्षात आणणे शक्य झाले असून डाळींबाबत भारत जवळपास स्वयंपूर्ण  झाला असल्याचे इन्स्टिट्यूट ऑफ पल्सेस रिसर्चचे संचालक डॉ. एन. पी. सिंग यांनी सांगितले.

डॉ. सिंग म्हणाले की, उत्तम तंत्रज्ञान विकास, दर्जेदार बियाण्यांची वाढीव उपलब्धता आणि त्याचबरोबर सुयोग्य सरकारी धोरणे यांच्यामुळे देशात चण्यांची क्रांती घडून आली आहे. वर्ष२००५-२००६ मधील उत्पादन ५.६० दशलक्ष मेट्रिक टनांवरून (एमएमटी) (प्रतिहेक्टर ८१० किलो उत्पादन)पासून यावर्षी ते १०.९० एमएमटीवर येऊन हे उत्पादन प्रतिहेक्टर १,०६७ किलोग्रॅम झाले असल्याच्या बाबीवरून हे दिसून येते. भारतातील कडधान्याच्या क्रांतीत चण्यांनी एक महत्त्वाची भूमिका बजावली असून भारत कडधान्यांबाबत जवळपास स्वयंपूर्ण झाला आहे.” “उत्तम हवामानाची परिस्थिती आणि वाढीव एमएसपीमुळे, तूर, उडीद आणि मूग यांच्या या वर्षातील खरीप पिकाच्या उत्पादनात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि त्यामुळे चण्यांच्या एकरेजमध्ये थोडीशी घट होण्याची शक्यता आहे. आमचा विश्वास आहे की, कडधान्यांची मागणी आगामी काळात वाढणार आहे. सध्याची मागणी २८ एमएमटी असून उत्पादन सध्या २४ एमएमटी आहे आणि २ एमएमटीच्या बफर साठा असतानाही आम्हाला जाणवले की, पुढील वर्ष २.५० एमएमटी ते ५ एमएमटीपर्यंत तुटवडा जाणवू शकतो.”

आयपीजीएकडून आयपीजीए नॉलेज सिरीजचा भाग म्हणून देशी आणि काबुली चण्यांवर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २५ देशांमधील ८५० पेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते. या वेबिनारमध्ये काबुली चण्यांचे उत्पादन, भारत आणि इतर मोठ्या प्रदेशांतील उत्पादन, नाफेडची खरेदी, साठवणुकीची आणि विक्रीची धोरणे, चण्याचे पीएमजीकेवाय योजनेअंतर्गत मोफत वितरणाचे परिणाम, काबुली चण्यांच्या जागतिक आणि भारतीय किमतींचा दृष्टीकोन, चण्याची निर्यात आणि मागणीचे स्वरूप, भारताचे आयात धोरण आणि दरपत्रक, काबुली चणा- उत्पादन आणि निर्यात इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.

             या चर्चासत्रात सहभागी झालेल्या दिग्गज वक्त्यांमध्ये उद्योगातील आघाडीचे मान्यवर आणि या क्षेत्रांतील तज्ञ होते. श्री. सुनीलकुमार सिंग- अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक, नाफेड, श्री. गौरव बगडाई- प्रवर्तक, जी पी एग्री, श्री. संजीव दुबे- संचालक, ग्रेन ट्रेंड प्रा. लि., ऑस्ट्रेलिया, श्री. जयेश पटेल- समूह सीईओ आणि कार्यकारी सदस्य, बजरंग इंटरनॅशनल ग्रुप, यूएई, श्री. केम बोगुसोग्लू- जागतिक प्रमुख- पल्सेस ट्रेडिंग, जी पी ग्लोबल ग्रुप, यूएई आणि श्री. नवनीत सिंग छाब्रा- संचालक, श्री शीला इंटरनॅशनल, इंडिया इत्यादींचा समावेश होता. या वेबिनारचे सूत्रसंचालन श्री. जी. चंद्रशेखर, ख्यातनाम अर्थतज्ञ, ज्येष्ठ संपादक, धोरण प्रवक्ते आणि कृषी व्यवसाय तज्ञ यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!