
नजरेमध्ये जे भरतं त्यालाच काही लोक सौंदर्य मानतात. जोडीदाराच्या बाबतीत त्यांच्या अशाच काहीशा अपेक्षा असतात. प्रत्येकच तरुणाला हवी आहे ती सुंदर, झिरो फिगर, शेलाट्या बांध्याची साथीदार… बाह्यरुपावर माणूस हुरळून जातो हा तर मनुष्य स्वभावचं… ” ठेंगणी”,”सावळी, “थोडी जाडी” “स्थूल” अशी नावं ठेवत काही मुलींच्या पदरी नकार येतो. थोड्या स्थूल असणाऱ्या मुलीला ‘नकार‘ देणारे तिच्या मनाचे सौंदर्य, तिच्यातील इतर गुणांची दखल घेत नाहीत. अशाच एका लठ्ठ पण गोड मुलीची दमदार गोष्ट म्हणजेच ‘सुंदरा मनामध्ये भरली’. मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या कथेची निर्मिती स्ट्रॉबेरी पिक्चर्सने केली आहे. अक्षया नाईक लतिकाची भूमिका आणि समीर परांजपे अभिमन्यूची भूमिका साकारणार आहेत. तेव्हा नक्की बघा ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ३१ ऑगस्टपासून पासून सोम ते शनि रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
Leave a Reply