
मुंबई:समरजीतसिंह घाटगे यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत भेट घेतली. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान व वाढीव वीज बिलाबाबत शासनाने त्वरीत निर्णय घ्यावा. तसेच शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या या प्रश्नावर येत्या अधिवेशनात निर्णय व्हावा. यासाठी त्यांना निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी मा. फडणवीस यांच्यासोबत जनतेच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चादेखील केली.त्याचबरोबर आंबे ओहोळ व नागणवाडी या रेंगाळलेल्या प्रकल्पाकडे त्यांचे लक्ष वेधले. मागील सरकारच्या काळात भरीव निधी मिळाल्याने या कामास गती मिळाली होती. पण सध्या या प्रकल्पास ब्रेक लागला आहे. तसेच कमी मोबदला मिळालेल्या तक्रारींकडे लक्ष वेधून प्रकल्पामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना निश्चित केलेप्रमाणे एकरी १४ लाख ४० हजार मोबदला हा दिलाच पाहिजे, अशी मागणी केली.
म्हणूनच येत्या अधिवेशनात आपणच आवाज उठवावा व या भागास वरदान ठरणारे हे दोन्ही प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.
Leave a Reply