सारस्वत बँकेतर्फे  मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी रुपयांचे योगदान

 

देशाच्या सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या सारस्वत बँकेतर्फे महाराष्ट्रातील कोविड-१९विषाणूच्या प्रदुर्भावाने ग्रस्त असलेल्या कोरोना रुग्णांच्या मदतीकरिता तसेच या परिस्थितीवर नियंत्रण आणण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी १ कोटी रुपयांचा निधी  ‘मुख्यमंत्रीसहाय्यतानिधी’ स देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे.कोविड-१९या वैश्विक महामारीमुळे सर्वत्र हाहाकार माजलेला आहे व या आजाराची भीषणता सर्वत्र जाणवत आहे. अनेक उद्योगधंदे, जनतेच्या नोकऱ्या ऐरणीवर आल्या आहेत. कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराने मृतव्यक्तींची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. अत्यावश्यक सेवा पुरवणारे आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या सुरक्षिततेकरिता दिवस रात्र झटत आहेत. या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाऊन, विविध उपाययोजना राबवून परिस्थिती सुधारण्या चे शर्थीचे प्रयत्न शासनातर्फे करण्यात येत आहेत.सारस्वत बँक ही महाराष्ट्राची हक्काची बँक आहे. बँकेने यापूर्वीही अनेक बिकट परिस्थितीत सर्वोतोपरी योगदान दिले आहे. २६/११ च्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना बँकेत नोकरी देऊन बँकेने आधार दिला होता. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करून त्यांचे विस्कळीत जीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यतानिधीस रुपये एककोटींची देणगी देऊन हातभार लावला होता. समाजाप्रती असलेले आपले ऋण वेळोवेळी आपल्याला फेडावेलागते, याचे भान सारस्वतबँकेने नेहमीच ठेवले आहे. आपली सामाजिक बांधिलकीची परंपराजोपासणाऱ्या सारस्वतबँकेने महाराष्ट्रातील जनतेच्या प्रति आपली निष्ठा कायम राखत जागतिक महामारीकोविड-१९च्या भीषण संकटावर मातकरण्यासाठी मदतीचा हात पुन्हा एकदा पुढे केलेला आहे.त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’ या निवासस्थानी भेट सारस्वतबँकेचे अध्यक्ष गौतम एकनाथ ठाकूर, उपाध्यक्ष शशिकांत साखळकर, जेष्ठ संचालक किशोर रांगणेकर, कार्यकारी संचालिका सौ. स्मिता संधाने व मुख्यमहाव्यवस्थापक अजयकुमार जैन यांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यतानिधी’ करिता रुपये एक कोटींचा धनादेश त्यांना सुपूर्द केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!