
कोल्हापूर : मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत विरोधात महाराष्ट्रभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. कोल्हापूरच्या शिवसेनेच्या रणरागिणीही आज कंगना राणावत चा निषेध करण्यात रस्त्यावर उतरल्या. अंमली पदार्थाच्या सेवनाची कबुली देणाऱ्या कंगना राणावत विरोधात अमली पदार्थ विरोधी पथकाने तत्काळ गुन्हा नोंद करावा, अशी जोरदार मागणी शिवसेना शहर महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली. शिवसेना शहर महिला आघाडीच्यावतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कंगना राणावतच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. कंगना राणावतच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध करीत तिच्या प्रतिमेच्या पोस्टरचे दहन केले.याठिकाणी “जय भवानी जय शिवाजी”, “मुंबईला पाकव्याप्त कश्मीर म्हणनाऱ्या कंगना राणावतचा धिक्कार असो”, “अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या कंगना राणावत वर गुन्हा नोंद झालाच पाहिजे”, “हमसे जो टकरायेगा, मिट्टी मे मिल जायेगा”, अशा निषेधाच्या घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर दणाणून सोडला.या वेळी शिवसेना कोल्हापूर शहर महिला आघाडीच्या पूजाताई भोर, गौरी माळतकर, मंगलताई कुलकर्णी, शाहीन काझी, सुनिता भोपळे, श्रद्धा यादव, ज्योती भोसले, सिंधू घोलप, सुलभा हंकारे, पूजा शिंदे, फातिमा बागवान, शिवसेनेचे रविभाऊ चौगुले, अरुण सावंत, जयवंत हारुगले, रमेश खाडे, रणजीत जाधव, किशोर घाटगे, सुनील जाधव, अमित चव्हाण, राजू काझी, विक्रम पवार, सुनील भोसले, राजू काझी, अश्विन शेळके, गणेश वाळवेकर, रमेश पोवार, किरण पाटील, सुनील करंबे, अंकुश निपाणीकर, राहुल माळी, विशाल पाटील, कपिल केसरकर, सम्राट यादव, कृष्णा लोंढे, सचिन पाटील, अशोक माने, कृपालसिंह रजपूत, प्रथमेश भालकर यांच्या सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply