आम आदमी’च्या वतीने ऑक्सिजन मित्र उपक्रम

 

कोल्हापूर:आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सूचनेनुसार ‘आप’च्या वतीने देशभरात ऑक्सिजन मित्र उपक्रम सुरू करण्यात आला. कोरोना बाधिताना कोणतेही लक्षण जाणवत नाही, पण अश्या वेळेला शरीरातील ऑक्सिजन पातळीवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. त्यामुळेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात वाढलेली रुग्णसंख्या पाहता येथे देखील घरोघरी जाऊन नागरिकांची ऑक्सिजन पातळी तपासणे व वेळे आधीच वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे बनलेले आहे. हीच बाब लक्षात घेऊन आम आदमी पार्टीच्या वतीने कोल्हापुरात ऑक्सिजन मित्र उपक्रमाची आजपासुन सुरुवात करण्यात आली आहे.सर्व राजकीय भेद बाजूला ठेवून जनतेसोबत राहून शक्य तेवढी मदत करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे.’ असे ‘आप’ केजरीवाल यांनी आवाहन केले आहे.’ऑक्सिमित्र’ म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतःच्या सोसायटी अथवा गल्ली अथवा वस्ती अथवा कामाच्या ठिकाणी गरजेनुसार लोकांना स्वतःकडील पल्स ऑक्सिमीटर विना मोबदला वापरुन ऑक्सिजन पातळी मोजून देते. जर ऑक्सिजन पातळी ९४ पेक्षा कमी असल्यास रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला देईल. ही ऑक्सिजन पातळी मोजण्यास केवळ अर्धा मिनिट पुरेसा होतो पण गरजू व्यक्तीला वेळेत रुग्णालयात जाण्याचा सल्ला मिळून जीव वाचवला जाऊ शकतो.कोविड हा श्वसन संस्थेचा आजार आहे. सुमारे १५% रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ शकतो आणि त्यांना रुग्णालयांमध्ये भरती करावे लागू शकते. तर कोविडच्या ८० ते ८५ % रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येतात. कित्येकांना तर लागण झाली आहे हे समजून सुद्धा येत नाही. तर अनेक ठिकाणी कोविड चाचणी रिपोर्ट येण्यास वेळ लागतो आहे.  यापैकी काही जणांमध्ये अचानक आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावली जाऊन गुंतागुंत होऊ शकते, परिस्थिती गंभीर होऊ शकते. वेळीच उपचार मिळणे आवश्यक असते.  तरी वेळोवेळी पल्स ऑक्सिमीटर या उपकरणाच्या साहाय्याने घरीच शरीरातील ऑक्सिजन पातळी तपासणे हे जास्त सोयीस्कर व सुरक्षित आहे. जर ऑक्सिजन पातळी कमी झाली असेल तर डॉक्टरी सल्ल्याने रुग्णालयात भरती होणे आवश्यक आहे.आप चे कार्यकर्ते मास्क घालून लोकांना भेटतील. सोबतच्या हँड सानिटायझरने बोट साफ करून जनतेची ऑक्सिजन पातळी तपासतील. ऑक्सिजन पातळी खालावलेली असल्यास स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्या रुग्णास पुढील वैद्यकीय सेवा मिळवून देण्यास मदत करतील.’ असे ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.या उपक्रमा अंतर्गत सर्व 81 वार्डात घरोघरी जाऊन ‘आप’च्या वतीने ऑक्सिमीटरच्या माध्यमातून ऑक्सिजनची पातळी तपासून नागरिकांना धीर देण्याचे काम करण्यात येणार आहे.या उपक्रमाचा आवाका आणखी वाढवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे ऑक्सिमित्र स्वयंसेवक होण्यासाठी पुढे यावे असे आवाहन देसाई यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!