
कोल्हापूर: कोल्हापूरला कोविड सेंटर साठी 60 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी प्रशासनाला सूचना करत असतानाच खा.युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शब्द दिला होता की निधी मिळवण्यासाठी जो काही पाठपुरावा करावा लागेल तो करीन.बैठकी नंतर लगेचच त्यांनी विभागीय आयुक्तांशी संपर्क केला. यावेळी कोल्हापूर करिता 60 कोटी रुपये त्यासोबतच सांगली, सोलापूर, आणि सातारा जिल्ह्यांची जी मागणी होती ती सुद्धा मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात सूचनाही दिल्या असून निविदेची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिवेशन झाल्यावर 4 ते 5 दिवसात निधी वर्ग होणार आहे.
कोल्हापूर व एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रातील कोरोना बाधित लोकांसाठी लवकरच अतिरिक्त सुविधा भेटतील असा मला विश्वास आहे,असेही खा.युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
Leave a Reply