
कोल्हापूर: गटनेते शारंगधर देशमुख यांच्या पुढाकारातून, रोटरी फॉउंडेशन तसेच कोल्हापूर महानगरपालिका आणि इतर सेवाभावी संस्थाच्या मदतीने साने गुरुजी वसाहत मैत्रागंण अपार्टमेंट येथे उभारण्यात आलेल्या तीस बेड व दोन व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या कोव्हीड सेंटरचे लोकार्पण करण्यात आले.या सेंटरला रोटरी क्लबने तीस बेड, स्ट्रेचर, क्रॅश कोर्ट, व्हील चेअर उपलब्ध करून दिले आहेत. तर संयुक्त उपनगर शिवजयंती समितीने ऑक्सिजनच्या सुविधेसाठी १ लाख ७५ हजार रुपये दिलेत. तसेच या ठिकाणी प्रशासनाकडून लवकरच डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत.सध्या जिल्ह्यासह देशभर कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु, अजूनही बरेच रुग्ण वेळेवर उपचार घेत नसल्याने आरोग्याची गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे, माझी सर्वांना विनंती आहे, लक्षणे दिसली की लगेच उपचार घेणे गरजेचे आहे. वॅक्सिन येई पर्यंत प्रत्येकाने स्वतः सोबतच कुटुंबाची काळजी घ्यायला हवी.या लोकार्पणावेळी, महापौर सौ. निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, गटनेते शारंगधर देशमुख, केडीसी बँक संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर, रोटरी क्लबचे ऋषिकेश केसकर, श्रीकांत झेंडे तसेच कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply