भाजपा कोल्हापूरच्यावतीने “सेवा सप्ताह”कार्यक्रमास सुरवात

 

कोल्हापूर: भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवस “सेवा सप्ताह” कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होणार आहे. आज या सेवा सप्ताहाच्या पहिला दिवशी रुग्णालये व गरीब वस्त्यांमध्ये फळे वाटून या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल मध्ये जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हॉस्पिमधील प्रसुती वॉर्ड मधील महिलांना फळांचे वितरण करण्यात आले. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चे प्रमुख डॉक्टर प्रकाश पावरा यांनी प्रमुख पदाधिकारी यांचे स्वागत करून आजच्या या उपक्रमाबद्दल आभार मानले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या कार्यामुळे आपल्या सर्वांना प्रेरणा मिळत आहे. संपूर्ण देशभरात भाजपा कार्यकर्ते सेवा सप्ताहाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत मोदीजींचा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांना दीर्घायुष्य लाभो व देशाची अखंड सेवा त्यांच्या हातून घडत राहो अशी सदिच्छा व्यक्त केली. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी, वॉर्ड अध्यक्ष विशाल शिराळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन तोडकर, ओंकार खराडे, निखील मोरे, आसावरी जुगदार, मंगला निप्पानीकर, सुधीन भांडे, अमित जाधव, शौलेश नाळे, भैया शेटके, अप्पा लाड, प्रवीणसिंह शिंदे, अमित शिंदे, अमित गर्दे आदी उपस्थित होते. शिवाजी पेठ मंडलामध्ये अंबाई टँक परिसरातील माजगांवकर मळा याठिकाणी फळे वितरण करण्यात आली. याठिकाणी जिल्हा संघटन सरचिटणीस अशोक देसाई, जिल्हा सरचिटणीस हेमंत आराध्ये, जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, राजू मोरे, संजय सावंत, विजय आगरवाल, भाजपा गटनेते अजित ठाणेकर, सचिन जाधव, सचिन सुतार, संतोष जाधव, राहूल पाटील, निलेश आजगांवकर, गिरीष साळोखे, प्रकाश घाटगे, प्राची कुलकर्णी, रजनी भुर्के, सुनील टिपुगडे हितेंद्र पटेल आदी उपस्थित होते. मंगळवार पेठ मंडलामध्ये बाल संकुल येथील विद्यार्थ्यांना फळांचे वितरण करण्यात आले. यावेळी मंडल अध्यक्ष संतोष माळी, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, विजय सूर्यवंशी, किरण नकाते, संभाजी जाधव, किशोरी स्वामी, सुलभा मुजूमदार, प्रमोदिनी हार्डीकर, गणेश चिले, प्रीतम यादव, शोभा भोसले, राजाराम नरके, अशोक लोहार, अरविंद वडगांवकर, सुभाष माळी, प्रशांत बरगे, स्वाती कदम तसेच बाल संकुलचे अधीक्षक पी.के.डवरी आदी उपस्थित होते. त्याचबरोबर माऊली वृद्धाश्रमस आवश्यक वस्तू पैकी खाद्य तेल व रुग्णांना ज्यूस वितरण करण्यात आला. शाहूपुरी मंडलाच्यावतीने सनराईज हॉस्पिटल येथे रुग्णांना फळांचे वितरण करण्यात आले. यावेळी नगरसेवक आशिष ढवळे, उमा इंगळे, मंडल अध्यक्ष प्रग्नेश हमलाई , मंडल उपाध्यक्ष प्रवीण सोळंकी, उदय इंगळे आदी उपस्थित होते. उत्तरेश्वर पेठ मंडलाच्यावतीने पंचगंगा हॉस्पिटल येथे रुग्णांना फळांचे वितरण करण्यात आले. यावेळी मंडल अध्यक्ष भरत काळे, दिपक काटकर, संदीप कुंभार, इक्बाल हकीम, प्रसाद मोहिते, विराज चिखलीकर, सुशांत पाटील, साजन माने, सुनिता सूर्यवंशी, सीमा बारामते, सुरज शिंदे आदी उपस्थित होते. कसबा बावडा मंडलामध्ये सेवा रुग्णालयात रुग्णांना फळे वितरीत करण्यात आलीत. यावेळी मंडल अध्यक्ष डॉ. राजवर्धन, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, जिल्हा चिटणीस प्रदीप उलपे, उद्योग आघाडी उपाध्यक्ष किसन खोत, मंडल सरचिटणीस संजय जासूद, संतोष पाटील, रविंद्र पवार, मनोज इंगळे, धीरज उलपे, तानाजी रणदिवे, अमित टिकले त्याचबरोबर सेवा रुग्णालयाचे चीफ मेडिकल ऑफीसर डॉ.उमेश कदम उपस्थित होते. सेवा सप्ताह कार्यक्रमामध्ये उद्या प्रमुख ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.१) शिवाजी पेठ – ताराबाई रोड सकाळी ७ वाजता २) मंगळवार पेठ – रामानंद नगर मारुती मंदिर ते स्टेट बँक सकाळी ८ वाजता ३) उत्तरेश्वर पेठ – जोशी गल्ली परिसर सकाळी ११ वाजता ४) लक्ष्मीपुरी – अयोध्या टॉकीज ते प्ररमाळे सायकल कंपनी सकाळी ८.३० ५) शाहूपुरी – विन्स हॉस्पिटल रोड सकाळी ८ वाजता ६) राजारामपुरी – ९ नंबर शाळा लकी बाजार शेजारी सकाळी ९.३० ७) क.बावडा – नदीघाट परिसर ७.३० शंंंंंं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!