
कोल्हापुर : मधील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्ली मॉडेलचा अभ्यास करुन कोल्हापुरात त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे करता येईल याचे निवदन मा.जिल्हाधिकारी कोल्हापुर यांना दिले.यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील कोव्हीड-19 परिस्थिती बाबत सखोल चर्चा करण्यात आली.त्यांनी ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांचे मुद्दे ऐकून घेतले. त्यातील काही मुद्यांवर त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. याबरोबरच सर्वेक्षणामध्ये आम आदमी पार्टीच्या स्वयंसेवकानी सहभागी होऊन जबाबदारी घ्यावी असे आवाहन केले.तसेच आम आदमी पार्टीने राबिवलेल्या ऑक्सिमित्र अभियानाची दखल घेत प्रशंसा केली.यावेळी ‘आप’ चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, संघटनमंत्री सूरज सुर्वे यांची उपस्थिती होती.
Leave a Reply