
कागल:कागल तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आहे. हीच परिस्थिती जाणून घेण्यासाठी आज भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी कागल कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी येथे उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी करत दिलासा देत त्यांना लवकरात लवकर कोरोनामुक्त होण्यासाठी शुभेच्छा त्यांनी दिल्या.
यावेळी रूग्णस्थिती, औषधोपचार व सोयींबाबत सविस्तर माहिती घेतली. त्याचबरोबर या सेंटरमध्ये काम करणारे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांना ही स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेण्यास सांगितले.कोरोना रुग्णांना मानसिक आधार देणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना कोरोनाशी लढताना बळ मिळत आहे. यावेळी “राजे, तुम्ही स्वतःची काळजी घ्या…!” असा हक्काचा आपुलकीचा सल्लादेखील काहींनी समरजितसिंह घाटगे यांना दिला.
यावेळी कोविड काळजी केंद्राचे प्रमुख डॉ अभिजित शिंदे, ग्रामीण रुग्णालय कागलच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुनिता पाटील, सौ स्वाती सोनवणे, प्रभारी नायब तहसीलदार वैशाली निकम, मिलिंद धुळे तसेच अनेक डॉक्टर्स व पोलीस बांधव उपस्थित होते.
Leave a Reply