‘तेरा यार हूं मैं’मधील नवीन व्यक्तिरेखा रिषभच्‍या जीवनात गोंधळ निर्माण करणार

 

अद्वितीय संकल्‍पना आणि हृदयस्‍पर्शी, पण विनोदी कथा असलेली सोनी सबवरील मालिका ‘तेरा यार हूं मैं’चे प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्‍यात येत आहे. राजीवने (सुदीप साहिर) त्‍याचा मुलगा रिषभचा (अंश सिन्‍हा) मित्र बनण्‍याचा निर्धार केला आहे, पण त्‍याने विचार केला आहे, त्‍याप्रमाणे ते सोपे नाही. रिषभचा मित्र बनण्‍यासाठी खोटे सोशल मीडिया आयडी बनवलेल्‍या राजीवला वाटते की, तो त्‍याच्‍या मुलाच्‍या जवळ आला आहे. पण राजीवचे सत्‍य रिषभच्‍या मित्रांसमोर उघडकीस येते.रिषभचे शाळेतील मित्र त्‍याच्‍या वडिलांनी केलेल्‍या कृत्‍याबाबत त्‍याला चिडवण्‍यास सुरूवात करतात. सुरूवातीला शाळेतील मित्रांना सामोरे जाणे टाळलेला रिषभ नवीन मुलगा शुभमच्‍या (राघव धीर) मदतीने त्‍यांना धडा शिकवण्‍याचे ठरवतो. रिषभला वाईट मार्गाने घेऊन जाणारा शुभम त्‍याला वाईट कृती करण्‍यास प्रोत्‍साहित करतो. तो त्‍याला त्‍याच्‍या वडिलांना फ्रेंड बनण्‍यासाठी काही अवघड नियमांचे पालन करण्‍याचा सल्‍ला देतो. वडिल मित्र बनण्‍याचा विचार सोडून देतील असे गृहीत धरून रिषभ राजीवला ‘ब्रो कोड्स’ सादर करतो. यामुळे राजीवसमोर अवघड कार्य उभे राहते. त्‍याला फ्रेंडप्रमाणे रिषभसोबत रात्री उशिरा फेरफटका मारणे अशा विचार न केलेल्‍या गोष्‍टी कराव्‍या लागतात.रिषभला त्‍याच्‍या वडिलांना मित्र बनण्‍यापासून दूर ठेवण्‍याकरिता संघर्ष करावा लागत आहे. दुसरीकडे त्‍याची बहीण त्रिशला (निहारिका रॉय) हिला दादाजीने (राजेंद्र चावला) तिच्‍यासाठी आणलेल्‍या विवाह प्रस्‍तावाचा धक्‍का बसतो. जान्‍हवी (श्‍वेता गुलाटी) तिच्‍या मुलीचा लवकर विवाह करण्‍याविरोधात उभी राहते. पण पुराणमतवादी मानसिकता असलेल्‍या दादाजींना वाटते की, त्रिशलाचा विवाह करण्‍याचे हेच योग्‍य वय आहे.जान्‍हवी तिच्‍या मुलीचा लवकर होत असलेला विवाह थांबवू शकेल का?राजीव रिषभचा मित्र बनण्‍यामध्‍ये यशस्‍वी होईल का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!