सीपीआर ट्रॉमा केअर सेंटर आगीमधील मृतांच्या वारसांना त्वरित नुकसान भरपाई द्या :भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे

 

कोल्हापूर: काल सीपीआर मधील ‘ट्रॉमा केअर’ सेंटर मध्ये आग लागली त्यामुळे व्हेंटिलेटर जोडेपर्यंत तीन रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला या गंभीर घटनेबाबत आज भारतीय जनता पार्टी शिष्टमंडळाच्या जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील गोर-गरीब जनतेचा हक्काचा दवाखाना म्हणजे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय होय. सध्या कोल्हापूर जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. कोल्हापूरमध्ये रोज शेकडो संक्रमितांची नोंद होत आहे. रुग्ण संख्येच्या मानाने वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे जिल्ह्यात मृत्यूदर 3% हून अधिक झाला आहे. त्यातच काल सीपीआर मधील ‘ट्रॉमा केअर’ सेंटर मध्ये आग लागली त्यामुळे व्हेंटिलेटर जोडेपर्यंत तीन रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला ही अतिशय गंभीर बाब आहे.भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी फोनद्वारे जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून घटनेची संपूर्ण माहिती घेऊन ट्रॉमा केअर सेंटर पूर्वरत होण्यासाठी प्रशासनाने त्वरित प्रयत्न करावे असे सुचवले. त्याचबरोबर या ट्रॉमा केअर सेंटरसाठी भारतीय जनता पार्टी म्हणून काही सहभाग लागल्यास त्यामध्ये देखील सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सुचवले.याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, गोर-गरीब रुग्णांना सीपीआर शिवाय अन्य ठिकाणी अन्यत्र उपचार घेणे आर्थिक बाबीमुळे शक्य होत नाही तरी सीपीआर मधील ‘ट्रॉमा केअर’ सेंटर २४ तासात पुन्हा पूर्ववत बनवावे. सीपीआर व शासनाच्या सर्व रुग्णालयांचे इलेक्ट्रिकल ऑडीट व्हावे जेणेकरून अशा घटना पुन्हा पुन्हा घडणार नाहीत, कालच्या या आगीच्या घटनेमुळे रुग्णांचे स्थलांतर करून व्हेंटिलेटर जोडेपर्यंत झालेल्या विलंबामुळे ज्या तीन रूग्णांचा मृत्यू झाला (आज समजलेल्या वृत्त नुसार चार मृत) त्यांच्या वारसांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांना केली.
याबाबत बोलताना प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, वारंवार फायर ऑडिट होणे गरजेचे असलेचे अग्नीशामन दलाने सूचित केलेले असताना देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्टाता यांनी दुर्लक्ष केलेले दिसून येते या बाबीची चौकशी होऊन संबंधीतांवर कठोर कारवाई करण्यात यावी. या घटनेची चौकशी होऊन उच्च स्तरीय समितीचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा असे संगितले.यावेळी संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, कोमनपा विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, भाजपा गटनेते अजित ठाणेकर आदी उपस्थित होते

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!