
कोल्हापूर:उत्तर प्रदेश मधील हथरस येथील समुहिक बलात्कार प्रकरणी पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असलेल्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली आणि या झटापटीत राहुल गांधी जमिनीवर कोसळले.या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण देशासह महाराष्ट्रात उमटले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ही कोल्हापूर काँग्रेस कमिटी च्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला आणि निदर्शने करण्यात आली.
पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार पी .एन.पाटील, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपमहापौर संजय मोहिते, शोभा कवाळे, पंचायत समिती सभापती अश्विनी धोत्रे, सचिन चव्हाण, तोसिफ मुल्लाणी, सुरेश कुराडे ,संपत चव्हाण पाटील, किशोर खानविलकर, पार्थ मुंडे, दिपक थोरात, महमद शरीफ शेख, संध्या घोटणे, वैशाली महाडिक आदी उपस्थित होते.
Leave a Reply