भाजपा मंगळपेठ मंडलाच्यावतीने टपाल दिन उत्साहात साजरा

 

कोल्हापूर: ९ ऑक्टोंबर जागतिक टपाल दिनाचे औचीत्य साधून भाजपा मंगळवार पेठ मंडलाच्यावतीने मंगळवार पेठ पोस्टामधील कर्मचा-यांचा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचेहस्ते गुलाब पुष्प व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.सध्याच्या आधुनिक युगात पोस्टकार्ड लिहण्याची पद्धत कमी होताना दिसत आहे.  फोन, मोबाईल, टी.व्ही. इंटरनेट अशा कोणत्याही सुविधा नसताना कित्येक वर्षे लोकांना एकमेकांशी संवाद साधताना टपालाशिवाय अन्य साधन नव्हते. पत्र येण्याची उत्सुकता, आपल्या प्रियजनांची खुशाली कळणार याची हुरहुर, पोस्टमन मामांचे वाट बघणे यामधील आतुरता आता अनुभवता येत नाही. यामुळे निदान टपाल दिना दिवशी तरी आपल्या प्रियजनांशी टपाला द्वारे संवाद साधा असे आवाहन राहूल चिकोडे यांनी स्वत:च्या हाताने टपालावर पत्र लिहून सोशल मिडीयाद्वारे सर्वांना विनंती केली.तसेच मंगळवार पेठ येथील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तेथील सब पोस्ट मास्तर सौ एस.एन.भोसले, पोस्टल असिस्टंट श्री युवराज माळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना राहूल चिकोडे यांनी वाचन, लेखन याद्वारे आपल्या मनातील विचार अधिक प्रभावीपणे मांडता येतात, विचारांना दिशा येते म्हणून आठवड्यातून किमान एक पत्र आपल्या संबंधित व्यक्तिंना लिहावे व हा एक मनाला आनंद देणारा छंद जोपासावा असे आवाहन त्यांनी केले.  त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी त्यांच्या एका देवरुख येथील मित्राला पत्र लिहून ते पत्र टपाल पेटीमध्ये टाकले.यावेळी भाजपा सरचिटणीस गणेश देसाई, मंडल अध्यक्ष संतोष माळी, सुभाष माळी, गणेश चिले, अरविंद वडगांवकर, नरेश पाटील, संग्राम पाटील, सचिन आवळे, नरेंद्र पाटील, मारुती माळी, योगेश सावेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!