
कोल्हापूर: कोरोनाचा संसर्ग धोका अजूनही टाळलेला नाही.
या पार्श्वभूमीवर यंदा श्री अंबाबाई शारदीय नवरात्रौत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कोरोना संसर्गामुळे मंदिरातील सर्व धार्मिक विधी हे शासनाच्या नियमानुसार करण्यात येणार आसलेची माहिती अध्यक्षांनी दिली.
नवरात्रौत्सवाच्या काळात रोज होणारी पालखी, तसेच ललित पंचमी आणि दसरा सोहळा यासाठी शासनाच्या नियमानुसार व अटींची पूर्तता करून सर्व धार्मिक विधी करण्यात येणार आहेत.तसेच श्री अंबाबाईची रोजची नित्यपूजा बघण्यासाठी शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणी मोठे स्क्रिनवर भाविकांसाठी ही सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ज्या भक्तांना देवीस देणगी द्यायची आहे त्यांना ऑनलाईन देणगी देता येणार आहे. तरी यावर्षी भक्तांनी दर्शनासाठी येऊ नये तसेच गर्दी करू नये, महिला वर्गाने तेल घालणे,ओटी भरणेसाठी मंदिराच्या परिसरात येणे टाळावे असे आवाहन देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी केले आहे.यावेळी देवस्थान समिती सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव,उपसचिव सौ.शितल इंगवले, अभियंता सुदेश देशपांडे, सुयश पाटील, मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव, मिलिंद घेवारी आदी उपस्थित होते.
Leave a Reply