
कोल्हापूर: आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने मिरजकर तिकटी या ठिकाणी “मंदिरे उघडा” यासाठी लाक्षणीक उपोषण करण्यात आले. सकाळी दहा वाजल्यापासून भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र झाले. “मंदिर बंद, उघडले बार…उद्धवा, धुंद तुझे सरकार”, “धार्मिक स्थळे सुरु करा” “भारतीय जनता पार्टीचा विजय असो” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या पंत बाळेकुंद्री महाराज भक्त मंडळाच्या भजन किर्तनाच्या माध्यमातून भक्तिमय गीते साजरी करून उद्धव सरकारला जाग येण्यासाठी साकडे घालण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, गेले सात महिने कोरोनाचे संकट चालू आहे, देशभरामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला होता, त्यावेळी आम्ही मंदिरे उघडा असे म्हंटले नाही पण सध्या मॉल, मद्यालये, देशी दारू दुकाने सुरु, पण मंदिरे बंदच आहेत. हिंदूधर्मामध्ये आध्यात्माला अत्यंत महत्व आहे. कोणताही भाविक मंदिरामध्ये गेला कि त्याचा मानसिक ताण कमी होतो त्यामुळे भारतीय जनता पार्टीने सातत्याने मंदिरे उघडण्याची मागणी आहे की, आता तरी मंदिरे उघडा पण सरकारला हे ऐकूच गेले नाही. त्यामुळे हे सरकार अत्यंत असंवेदनशील आहे. तसेच बार, रेस्टॉरंट मध्ये गेलेला माणूस मास्क काढून वावरतो परंतु मंदिरामध्ये गेलेला माणूस हा मास्क काढणारच नाही आहे त्यामुळे मंदिरे ही कधीच सुरु व्हायला पाहिजे होती. पण ज्यांनी आज पर्यंत हिंदुत्व जगले, अध्यात्म मांडले ते आता कुठे तरी कॉंग्रेसमय झाले आहेत त्यामुळे त्यांना हे काही ऐकू जात नाही आहे. “उद्धवा अजब तुझे सरकार”हे गाणे आजच्या या प्रसंगी संयुक्तीक असल्याचे दिसते. आज जर लोकमान्य टिळक असते तर ते पुन्हा एकदा म्हंटले असते या सरकारचे डोके ठिकाणावर नाही. त्यामुळे आजच्या आंदोलनामध्ये भाजपची मागणी आहे कि, आमची मंदिरे, आमची श्रद्धास्थाने त्वरीत खुली करा.
याप्रसंगी बोलताना संघटन सरचिटणीस अशोक देसाई म्हणाले की, प्रखर हिंदुत्ववादी असणा-या शिवसेनेने आपले हिंदुत्व विसरून आपल्या तत्वांना तिलांजली देऊन सत्तेच्या राजकारणासाठी आपली भुमीका निद्रस्त कुंभकर्णासारखी ठेवली आहे. अशा कुंभकर्णाला जाग आणण्यासाठी आज महाराष्ट्रात मंदिरे उघडा या मागणीसाठी आंदोलन करायला लागणे हे अत्यंत दुर्देवी असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, संपूर्ण देशात कोरोनाचे संकट अजून सुरु आहे, पण महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे प्रमाण जास्त आहे आता पर्यंत जे मृत्यु झाले त्यापैकी २३ टक्के मृत्यु हे महाराष्ट्रामध्ये झाले आहेत. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी हे सरकार संपूर्ण अपयशी ठरले आहे. सरकारने महसूल गोळा करण्याच्या हेतूने मद्यालये सुरू केली आहेत मात्र लोकांची श्रद्धा असणाऱ्या धार्मिक स्थळांवर अजून अनेक निर्बंध घातले आहेत. मंदिरा बाहेर असणाऱ्या छोटे साहित्य विकणारी दुकाने, खाद्य दुकाने यांची उपजीविका या मंदिरावर अवलंबून आहे अशा अनेक लहान घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आई अंबाबाई चरणी प्रार्थना करून या ठाकरे सरकारला येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर मंदिरे उघडण्यासाठी सुबुद्धी द्यावी ही प्रार्थना केली.
नगरसेविका उमा इंगळे, प्रमोदिनी हर्डीकर, गिरीष साळोखे, विजयसिंह खाडे-पाटील, विशाल शिराळकर, अप्पा लाड, चंद्रकांत घाटगे यांनी मंदिरे उघडा या बाबतच्या आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री महोदयांनी घराबाहेर पडून भाविकांना मंदिरे उघडी करून द्यावीत भक्तांच्या भावनांचा अंत पाहू नये असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी बुद्धीची देवता गणेशाची आरती करून उद्धव सरकारला सुबुद्धी दे असे साकडे घालण्यात आले.
यावेळी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, राजू मोरे, अमोल पालोजी, विजय आगरवाल, दीपक काटकर, प्रदीप उलपे, सुनिलसिंह चव्हाण, दिग्विजय कालेकर, भाजपा गटनेते अजित ठाणेकर, मंडल अध्यक्ष संतोष माळी, भरत काळे, रवींद्र मुतगी, प्रग्नेश हमलाई, संजय जासूद, गणेश चिले, अभि शिंदे, ओंकार खराडे, साजन माने, मानसिंग पाटील, निलेश आजगावकर, विशाल शिराळकर, बापू राणे, तानाजी निकम, आशिष कपडेकर, रोहित कारंडे, भैया शेटके, प्रवीणचंद्र शिंदे, विराज चिखलीकर, नजीर देसाई, सागर केंगारे, हर्षद कुंभोजकर, दिलीप बोंद्रे, हिंदुराव मळेकर, सचिन काकडे, अरविंद वडगावकर, प्रसाद मोहिते, राजाराम नरके, सुनील पाटील, मयूर कदम, संदीप कुंभार, मनीष घोसाळकर, नजीम अत्तार, सिद्धेश्वर पिसे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत, मंगल निपणीकर, आसावरी जुगदार, संगिता खाडे, शोभा भोसले, सुनीता सूर्यवंशी, शोभा लोहार, सुजाता पाटील, शुभांगी चितारे, विद्या बनछोडे, माधुरी हिरेमठ, विद्या बांगडी, सीमा बारामते, माधुरी हिरेमठ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply