कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ईएसआयची सेवा दवाखाने मंजूर : खा.संजय मंडलिक

 

कोल्हापूर: औद्योगिक वसाहतीमध्ये ईएसआयसीचे सभासद असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेत व त्यांच्या औद्योगिक वसाहतीच्याठिकाणी उपचार मिळावेत म्हणून चेंबर ऑफ कॅामर्स व जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटना, असोसिएशन, कामगार युनियन यांनी खासदार संजय मंडलिक यांचकडे केलेल्या मागणीनुसार चार औद्योगिक वसाहतींमध्ये सेवा दवाखाने मंजूर झाल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली.यासंदर्भात अधिक माहिती देताना खासदार मंडलिक म्हणाले, ‘ वैद्यकीय सेवा आपल्या दारी ‘ या संकल्पनेनुसार औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांना व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटूबीयांना त्यांच्या रहिवास ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी औद्योगिक वसाहत कागल, औद्योगिक वसाहत शिरोली, औद्योगिक वसाहत हातकणंगले व औद्योगिक वसाहत हलकर्णी याठिकाणी ईएसआयचे सेवा दवाखाने सुरु करावेत, अशा मागणी केंद्रीय श्रम मंत्रालयात वेळोवेळी केली होती, त्यानुसार या चारही औद्योगिक वसाहतीमध्ये सेवा दवाखाने मंजूर झाले असून याठिकाणी तज्ञ डॅाक्टर्स व औषधे उपलब्ध होणार असल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले.  याकामी खासदार मंडलिक यांचे सहकारी चेंबर ऑफ कॅामर्सचे संचालक व हॅास्पिटल समन्वयक विज्ञान मुंडे यांनी खास प्रस्ताव तयार करुन विशेष पाठपुरावा केला. ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे केंद्र शासनाच्या वतीने कर्मचाऱ्यांकरीता बांधण्यात आलेल्या रुग्णालयाचा लाभ सुमारे दीड-दोन लाख कामगार व त्यांचेवर अवलंबून असलेले त्यांचे नातेवाईक यांचेसह सुमारे पाच लाख रुग्णांना होतो.  या रुग्णांना औषधोपचार व इतर बाबींकरीता कोल्हापूर येथे यावे लागत होते त्यामुळे त्यांचा वेळेचा व पैशाच अपव्यय होत असल्याकारणाने नविन सुरु होणाऱ्या सेवा दवाखान्यामुळे या रुग्णांना वैद्यकीय सुविधा त्यांच्या औद्योगिक वसाहतीच्या परिसरात विनामोबदला मिळणार आहेत.  खासदार मंडलिक यांनी संसदेत व संसदेच्या बाहेर याकरीता सातत्याने पाठपुरावा केल्याने औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांच्याकरीता जास्त संख्येने सेवा दवाखाने सुरु करणारा कोल्हापूर जिल्हा हा देशातील पहिलाच जिल्हा बनला असल्याने उद्योजक व कामगार बांधवांनी सर्व प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल असलेल्या खासदार मंडलिक यांचे आभार मानले असून निरनिराळ्या औद्योगिक असोसिएशनकडून त्यांचा लवकरच सत्कार आयोजीला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!