
आपण ‘द चाइल्डइज द फादर ऑफ द मॅन’ हे ऐकत मोठे झालो आहे. पण प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर बालपणी मला नेहमीच एक प्रश्न पडायचा की ‘याचा खरा अर्थ काय आहे?’मी हे वाक्य ऐकल्यापासून काळ पूर्णत: बदलला आहे. तसेच नाते देखील बदलले आहे. आज २०२० मध्ये ‘मूल’ व ‘वडिल’ यांच्यामध्ये असलेले नाते बरेच विकसित झाले आहे.एक कलाकार म्हणून मी विविध भूमिका साकारल्या आहेत. सध्या मी मालिका ‘तेरा यार हूं मैं’मध्ये किशोरवयीन मुलाचा वडिल राजीव बंसलची भूमिका साकारत आहे. वास्तविक जीवनात देखील मी एका तरूण मुलाचा वडिल आहे. मी मुलाच्या भूमिकेतून देखील गेलो आहे. तसेच वडिलांची देखील भूमिका साकारत आहे. यामध्ये मागे वळून पाहिल्यास प्रवास अत्यंत अद्भुत वाटतो आणि नेहमीच एका निष्कर्षावर येऊन थांबतो की, कुटुंबामधील आपली भूमिका काळानुरूप बदलली आहे आणि मुलांच्या बदलत्या भूमिकांबाबत देखील बोलणे गरजेचे आहे.तुम्ही माझ्या वयाचे आहात आणि हा लेख वाचत असाल तर शक्यता आहे तुम्ही एका गोष्टीवर निश्चितच वादविवाद कराल की आपल्यामध्ये अधिक लक्षणीय सामाजिक व पिढीनुसार बदल झाले आहेत. पण मला येथे ‘मूलमाणसाचेवडीलआहे’ या वाक्यावर अधिक लक्ष द्यायचे आहे. रचनात्मकदृष्ट्या हे वाक्य संबंधित नसेल. पण माझा विश्वास आहे की, आपण करू शकणा-या गोष्टींपेक्षा वास्तविकत: आपल्या मुलांकडून भरपूर काही शिकू शकतो.सोनी सबवरील मालिका ‘तेरा यार हूं मैं’साठी विचारण्यात आले तेव्हा मला आनंद होण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे वडिल-मुलाच्या नात्यावर लक्ष केंद्रित करणारी मालिका टेलिव्हिजनवर कधीच दिसण्यात आलेली नाही. ही संकल्पना टेलिव्हिजनवर नवीन असेल, पण आपल्या सर्वांसाठी अत्यंत जुडले जाता येणारी आहे.
Leave a Reply