
सोनी सबवरील अत्यंत लोकप्रिय ऐतिहासिक काल्पनिक मालिका ‘तेनाली रामा‘ दिग्गज विद्वान व कवी तेनाली रामाच्या प्राचीन कथा व किस्से सादर करत प्रेक्षकांची मने जिंकत आहे. तसेच ही मालिका प्रेक्षकांना राजा कृष्णदेवरायच्या विजयनगर साम्राज्यामध्ये देखील घेऊन जाते. मालिकेला कुटुंबातील सर्व वयोगटातील व्यक्तींचे मनोरंजन करणा-या सर्वसमावेशक व मूल्याधारित पटकथेसाठी प्रचंड प्रेम व पाठिंबा मिळत आहे.टेलिव्हिजनवर मालिकेला मिळालेले भव्य यश आणि आतापर्यंत मालिकेमधील अनुभवाबाबत बोलताना सर्वांचा लाडका पंडित राम कृष्णाची भूमिका साकारणारा कृष्णा भारद्वाज आणि सुप्रसिद्ध राजा कृष्णदेवरायची भूमिका साकारणारा तरूण खन्ना यांनी कलाकार म्हणून आतापर्यंतच्या प्रवासाला आणि इतर अनेक गोष्टींना उजाळा दिला.मागील साडेतीन वर्षांपासून पंडित राम कृष्णा म्हणून अधिक ओळखले जाणारे कृष्णा भारद्वाज आतापर्यंतच्या प्रवासामधील प्रमुख गोष्टींना उजाळा देत म्हणाले,”मी दीर्घकाळापासून तेनाली रामाची भूमिका साकारत आलो आहे, ज्यामुळे मला तेनाली रामापूर्वीचे माझे जीवन आठवत नाही. पंडित राम कृष्ण हा माझ्या जीवनाचा भाग आहे आणि मला आनंद होत आहे की, मला रामाचे उल्लेखनीय गुण आत्मसात करण्याची संधी मिळाली. या मालिकेने मला चाहत्यांकडून भरपूर प्रेम व पाठिंबा मिळवून दिला आहे. एखादी भूमिका कोणा व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यामध्ये यशस्वी होते, तेव्हा ती एक हृदयस्पर्शी भावना असते. अनेक चाहते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला मालिकेने कशाप्रकारे त्यांना हसवले किंवा अवघड स्थितीचा सामना करण्यामध्ये मदत केली याबाबत सांगितले. एक कलाकार म्हणून माझ्यासाठी हे अत्यंत समाधानकारक आहे.”कृष्णा पुढे म्हणाले,”मला वाटते की, पंडित राम कृष्णाची भूमिका साकारण्याची संधी मिळणे हे माझ्या नशीबातच होते. माझ्या बालपणापासूनच माझी तयारी सुरू झाली. मी हिंदी भाषिक कुटुंबामधील आहे आणि माझे वडिल पीएच.डी. पदवीधारक आहेत. माझे काका देखील संस्कृत विषयामध्ये पदव्युत्तर पदवीधारक आहेत. म्हणून मला भाषेसंदर्भात कधीच समस्या जाणवली नाही. पंडित राम कृष्णासाठी माझे सादरीकरण व प्रेरणास्रोत आधुनिक श्रीकृष्ण देव राहिले आहेत.”
Leave a Reply