दक्षिण मतदार संघाच्या विकासासाठी कमी पडणार नाही: पालकमंत्री सतेज पाटील

 

कोल्हापूर: प्रभाग क्रमांक ७१ येथील एकजुटी तरूण मंडळ, कपिल पार्क, तसच शिवराम पोवार नगर, काशीद कॉलनी, त्याचबरोबर कृपासिंधु नगरी आणि लक्ष्मी बळवंतनगर येथील अंतर्गत रस्ते तसंचं काही ठिकाणच्या ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, कॉंग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, नगरसेवक विनायक फाळके आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना, पालकमंत्री सतेज पाटील यांनी, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर कोरोनाच्या संकट काळातही कोल्हापूरसाठी ४३ कोटीचा निधी मंजूर करून आणल्याच त्यांनी सांगितले. मात्र मार्च पासून कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्याने विकास कामांची सुरवात करता आली नसल्याचही त्यांनी सांगितले. जो निधी उपलब्ध आहे, त्यातून विकास कामे दर्जेदार आणि तातडीने करण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचनाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या. दरम्यान कोरोनाचा संसर्ग कमी आला असला तरी, लोकानी आपल्या आरोग्याच्या बाबतीत दक्ष राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. कोल्हापूर शहरासाठी जे-जे काही करता येईल त्यासाठी आपण कुठेही कमी पडणार नाही. प्रामुख्याने दक्षिण मतदार संघाच्या विकासासाठी आमदार ऋतुराज पाटील आणि आपण कमी पडणार नाही. सर्व विकास कामे निश्चित पणे पूर्ण करू अशी ग्वाही देखील पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. यावेळी भिकाजी गावकर, बाबुराव भुरके, कुंडलिक साखळकर, किरण पाटील, सुवर्णा महादेव मोरे, माया तगारे, संध्या क्षीरसागर, उर्मिला सोनूर्लेकर, महेश सासणे, हिंदुराव पाटील, सुरेश सुर्वे यांच्यासह भागातील नागरिक, महिला, तरून मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!