वन्य प्राण्यांचा बंदोबस्त तातडीने करावा : खासदार संजय मंडलिक

 

कोल्हापूर : वन्य प्राण्यांचा अधिवास हा मानव वसाहतीकडे वाढत असून वन्यप्राण्यांच्या हल्यामध्ये जीवीत व पिक हानी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्यांच्या बदोबस्त व झालेल्या नुकसानीची भरपाई यासंदर्भात खासदार संजय मंडलिक यांचे अध्यक्षतेखाली वन विभागाच्या मुख्य कार्यालयात आज रोजी आढावा बैठक झाली असून या बैठकीस चंदगडचे आमदार राजेश पाटील व राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर, मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, विजय देवणे, सुनिल शिंत्रे, नगरसेवक संभाजी पाटील हे उपस्थित होते.चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यात नागरी वसाहतीमध्ये हत्ती फिरत असलेकारणाने यांच्यावर तातडीने उपाययोजना व्हाव्यात याकरीता आजरा आजरा तालुक्यातील हत्ती कर्नाटक पॅटर्न वापरून परत पाठवणे व कर्नाटकातून चंदगड मध्ये येणारे हत्ती यांचा वायर फ्लेमिंग उभे करून प्रतिबंध करणे.  मुंबई येथे मा.वनमंत्र्यांसोबत बैठक घेणे व नोव्हेंबरमधील पहिल्या आठवड्यात आढावा बैठक घेणे व हत्ती, गवे व इतर जनावरांमुळे होणारे शेतीचे नुकसान बाजारभावाप्रमाणे देणे असे महत्वाचे निर्णय या बैठकीदरम्यान घेण्यात आले.  यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक – महाराष्ट्र राज्य व प्रधान मुख्य वनसंरक्षक – कर्नाटक राज्य यांचेशी समन्वय करणयाची जबाबदारी मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांचेवर सोपविण्यात आली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!