पालकमंत्री सतेज पाटील यांचा महानगरपालिका कर्मचारी संघाच्यावतीने सत्कार

 

कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना शासनाने सातवा वेतन आयोग लागू केल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार सतेज पाटील यांचा कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाच्या वतीने आज सत्कार करण्यात आला.
महापालिकेच्या रोजदारी कामगारांना कायम करण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू, आशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी दिली.महानगरपालिका कर्मचारी संघाच्या वतीने अजिंक्यतारा येथे आज पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी महापालिकेचे काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले, जनरल सेक्रेटरी दिनकर आवळे ,उपाध्यक्ष काका चरापले, कार्याध्यक्ष विजय वनकुद्रे, सहसचिव अजित तिवले यांच्यासह कर्मचारी संघाच्या कार्यकारणीचे सर्व सदस्य, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!