
कागल: आज दस-याच्या शुभमुहूर्तावर श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ४१ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ केला. या हंगामात कारखान्याने दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सभासद, बिगर सभासद यांनी नोंद केलेला संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवून सहकार्य करावे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आजचा हा सोहळा सर्व नियमांचे पालन करीत कौटुंबिक व मंगलमय वातावरणात पार पडला. कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या मार्गदर्शनखाली सुरू असलेली उच्चांकी ऊस दराची परंपरा त्यांच्या पश्चातही कारखान्याने कायम राखली आहे. या हंगामासाठी सुद्धा उच्चांकी ऊस दर देण्यात मध्ये शाहू कारखाना अग्रभागी असेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Leave a Reply