‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’

 

संत तुकाराम महाराजांनी ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’ असे आपल्या एका अभंगात म्हटले आहे. याचा अर्थ कोणतेही कार्य सिद्धीस न्यायचे असेल, पूर्णत्वास न्यायचे असेल तर मन प्रसन्न ठेवणे गरजेचे आहे. यात मनाच्या शक्तीचे व ते निरोगी ठेवण्याचे महत्व स्पष्ट होते. आता मन प्रसन्न ठेवायचे म्हणजे नेमके काय करायचे ? हा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो. वर्षाचे ३६५ दिवस मन कसे प्रसन्न ठेवता येईल? शरीर बळकट करण्यासाठी मोठे मोठे जीम आज बाजारात उपलब्ध आहेत. हजारो रुपये फीस भरून आपण तिथे जातो. तसा मनाचा कधी विचार करतो का? त्याला काय पुरविले कि ते प्रसन्न राहील. आपल्या वाढदिवसादिवशी आपले मन प्रसन्न असते कारण तो दिवस आपल्यासाठी विशेष असतो. असा प्रत्येक दिवस विशेष कसा करता येईल? याची हातोटी आपल्याला माहित होणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वतःशी संवाद साधने आवश्यक आहे. कोणती गोष्ट केल्यानंतर माझे मन प्रसन्न होते ? कोणत्या गाष्टीचा मला तिटकारा आहे ? माझी विचार करण्याची पद्धत योग्य आहे का? माझे नातेसंबंध सुदृढ आहेत का? माझे कामाचे नियोजन योग्य आहे का? माझे शरीर निरोगी आहे का ? अश्या काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधावी लागतील. याची उत्तरे नकारात्मक असतील तर त्यावर आपल्याला काम करावे लागेल. कारण मन अप्रसन्न असण्याचे ते एक कारण असू शकेल.कामाचे योग्य व्यवस्थापन, सुदृढ नातेसंबंध, निरोगी शरीर व त्यासाठी पूरक असलेला व्यायाम, योगा., चांगले मित्र, विचाराचे योग्य व्यवस्थापन, अर्थाचे योग्य व्यवस्थापन अश्या काही गोष्टी सर्वांचेच मन प्रसन्न ठेवण्यासाठी साह्यभूत ठरू शकतात.एखादा छंद , कला व त्यासाठीचा असलेला ध्यास, एखादे ध्येयाची आसक्ती,पर्यटन, निसर्ग , निःस्वार्थ सेवा , खेळ , वेशभूषा, खाद्यपदार्ध, आवड मन प्रसन्न ठेवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात,नकारात्मक गोष्टी पासून दूर राहणे, व्यसनापासून दूर राहणे , ताण-तणावापासून दूर राहणे मनाच्या प्रसन्नतेसाठी आवश्यक आहे.माझ्या मनाची प्रसन्नता हि माझ्याच हातात आहे हे कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. शरीराकडून १००% काम करून घ्यायचे असेल तर मन १००% प्रसन्न असणे आवश्यक आहे. एकदा का या या गोष्टी केल्या कि माझे मन प्रसन्न असते याचे इंगित प्रत्येकाला समजले कि त्या त्या गोष्टी सातत्याने करणे मन कायम प्रसन्न ठेवण्यासाठी आवश्यक आहे. हे प्रयत्नपूर्वक जमू शकते. सवयीने अश्या मनाच्या प्रसन्नतेवरच्या वाटेवर चालणे जमू शकते. काही काळं जरी आपल्याकडून ही वाट चुकली तरी ते आपल्या लक्षात येते कि आपण चुकीच्या वाटेवर चाललो आहोत. तसे संकेत मन आपल्याला देते . हे सर्व एका दिवसात साध्य होणे शक्य नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे . तेव्हा अशी मनाच्या प्रसन्नतेची वाट आपल्या सर्वानाच सापडो हिच सदिच्छा !(महेश भा. रायखेलकर )
9326612436

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!