
कोल्हापूर: शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त स्त्रीशक्तीचा जागर करण्यात आला. या अनुषंगाने आम आदमी पार्टी कोल्हापूर महिला आघाडीच्या वतीने ‘शक्ती पर्व’ आयोजित करण्यात आले. या शक्ती पर्वाचे हे प्रथम वर्ष होते. यामध्ये स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याच्या हेतूने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना “अपराजिता” पुरस्कार देण्यात आले.यामध्ये उद्योजिका शुभांगी थोरात व संध्या कुंभारे, फायर वूमन अर्पिता शेलार, अंध व्यक्तींसाठी वाचन करणाऱ्या अनुजा नेटके, शिक्षण चळवळ बळकट करणाऱ्या सरिता सुतार, गिर्यारोहक कस्तुरी सावेकर, सफाई कर्मचारी संतोषी छत्रीबंद, आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ. रेश्मा पवार व स्मित शिवदास, विज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी कार्य करणाऱ्या सुजाता म्हेत्रे यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या गीता हसुरकर होत्या.यावेळी सर्व मान्यवरांनी त्यांच्या आयुष्यात घेडलेला एक विशिष्ट प्रसंग सर्व उपस्थितांसमोर व्यक्त केला. ‘आप’च्या महिला शहराध्यक्षा अमरजा पाटील यांनी प्रास्ताविक केले. ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी पुरस्कारा मागची भूमिका मांडून समारोप केला. युवाध्यक्ष उत्तम पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
Leave a Reply