
कोल्हापूर : दोन वर्षांपूर्वी झालेली दुर्देवी आत्महत्या यास कारणीभूत ठरवत आज ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांना कोणतीही नोटीस न देता अतिशय निंदनीय पद्धतीने पोलिसांनी अटक केली. या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी कोल्हापूर तर्फे बिंदू चौक येथे सामाजिक अंतर पाळून भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. पोलिसांची दडपशाही वापरून महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा अपमान करत ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांना आज अटक केली. याबद्दल सामाजिक माध्यमातून संपूर्ण देशभरात महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकार विरोधात टीका होत आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, लोकशाही मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गात प्रत्यक्षात मात्र माध्यमांच्या गळचेपीचे काम सुरु आहे. लोकशाही, व्यक्ती स्वातंत्र्य, माध्यम स्वातंत्र्य असताना हे सरकार ऊठसूट त्याच्या विरोधात बोलले आणि सत्य बाजू दाखवली की वैयक्तिक सूड भावनेपोटी त्या व्यक्तीला कोणतेही कारण न देता अटक करणे, तुरुंगात डामणे अशा घटना वारंवार घडत आहेत. १९७५ साली आणीबाणीची परिस्थिती होती ती पुन्हा येईल की काय अशी आता भीती वाटू लागली आहे. भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्यावतीने सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांना अर्णब गोस्वामी जेलमधून सुटत नाही तोपर्यंत काळ्या फिती बांधून काम करावे असे आवाहन केले आहे. आज एक अभ्यासू व ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी महाराष्ट्र सरकारने पोलीसांकरवी एखादा अतिरेकी पकडावे अशी अटक कोणते किंवा नोटीस न देता करण्यात आली हे लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने तसेच वृत्तपत्रे व माध्यमांच्या दृष्टीने अत्यंत निषेधार्ह घटना आहे. म्हणून भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने निदर्शने करत आहे. १९७५ च्या आणीबाणीच्या काळात वृत्तपत्रांची व माध्यमांची मुस्कट दाबी केली होती. त्याचप्रमाणे सध्याचे आघाडी सरकार चुकीच्या पद्धतीने खरे बोलणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात जुनी २ वर्षा पूर्वीची बंद केस सुरु करून मुस्कट दाबी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. म्हणून आज आम्ही ऐतिहासिक बिंदु चौकात सत्तारूढ राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करत आहोत असे नमुद केले
Leave a Reply