महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार विजयी होतील; प्रचारार्थ मेळावा संपन्न

 

सातारा: पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातून महाविकासघडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगांवकर तर पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड यांच्या प्रचारार्थ आज सातारा येथे सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला.महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी पुणे विभागाच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार नक्की विजयी होतील याची आम्हाला खात्री आहे.या मेळाव्याला, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, साताऱ्याचे पालकमंत्री व राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री ना. शंभूराजे देसाई, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, सत्यजित पाटणकर, राजेश पाटील वाठारकर, प्रभाकर धार्गे, प्रभाकर देशमुख, प्रताप मोहिते, नितीन बानगुडे पाटील, सारंग पाटील, रणजित देशमुख-खटावकर, सुनील माने, चंद्रकांत जाधव, मनोहर शिंदे, उदयसिंह पाटील, देवराज पाटील, तसेच संपूर्ण सातारा जिल्ह्यातून आलेले महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!