
कोल्हापूर: आगामी पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने आज जिल्हा भाजपची बैठक माझ्या निवासस्थानी झाली. आजवर या मतदार संघावर भाजपचाच वरचष्मा राहिला आहे, ही परंपरा आम्ही कायम राखू. यावेळी तर कोल्हापूर जिल्ह्याने विक्रमी मतदार नोंदणी केली असून हेच कोल्हापूर संग्राम देशमुख यांना विक्रमी बहुमत देईल, अशी ग्वाही दिली.माजी खासदार धनंजय महाडिक यावेळी म्हणाले, पुणे जिल्ह्याप्रमाणे आपल्याला नियोजन करून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. याची जबाबदारी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घ्यावी व कोल्हापुरातून जास्तीत जास्त लीड देवून भाजपला या भागात आणखी बळकटी द्यावी. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी सर्व तालुक्यांचा आढावा घेऊन, पदवीधर मतदाराची भूमिका, अपेक्षा व पक्षाची भूमिका याबाबद्दल चर्चा केली.यावेळी माजी आमदार अमल महाडिक, अशोक चाराटी, बाबा देसाई, माणिकराव पाटील, अरुण इंगवले ,भरमुआणा पाटील,राहुल देसाई यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, तालुकाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply