
कागल :महाविकास आघाडीचे दोन्ही उमदेवार शिक्षण व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम आहेत. पक्षाच्यावतीने उमेदवार आहेत. कोरोना नियंत्रणासाठी प्रचंड निधी लागला. या काळात उत्पन्नाचे स्रोत थांबले असताना शिक्षकांचे वेतन थांबविले नाहीत. निसर्ग चक्रीवादळासारखे संकट आले. दुसरी कोरोनाची लाट आली नाही तर विकास कामाला गती येईल. भाजपाच्या काळात न सुटलेले शिक्षकांचे प्रश्न निश्चितपणे सोडवू. विरोधी पक्षाने सरकार अडचणीत आणण्याचा सतत प्रयत्न केला. पदभरतीची स्थगिती उठल्यावर २३ हजार नोकरभरती करून पदवीधरांचे प्रश्न सुटतील. नियतीला भाजपचे सरकार यावे असे वाटत होते म्हणून आमचे सरकार आले. मिळालेल्या संधींचे सोने करूया.जयंत आसगावकर व अरुण लाड यांच्यामुळे सभागृहाची प्रतिमा उंचावेल, असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.
मतदार संघाचे उमेदवार जयंत आसगावकर व पुणे पदवीधर कागलमध्ये शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर व पदवीधर मतदार संघाचे अरुण लाड यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर मेळाव्यात ते बोलत होते.पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, माजी आमदार संजय घाटगे, उमेदवार जयंत आसगांवकर, भैय्या माने, बाबा पाटील,भरत रसाळे, दादा लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.भाषणात मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, शिक्षण क्षेत्रात वेगवेगवे प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व असावे. शिक्षकांचे व पदवीधरांचे प्रश्न सोडविणारे सक्षम उमेदवार महाविकास आघाडीने दिले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. नव्या शैक्षणिक धोरणातील आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. यासाठी अभ्यासपूर्ण मांडणी करणारा असा जयंत आसगांवकर यांच्यासारखा आमदार असावा. यासाठी महाविकास आघाडीच्या कर्तत्ववान उमेदवारांना निवडून द्यावा. शिक्षकांचे व पदवीधरांचे लिड कागलमधून मिळेल. कागल तालुका विजयाचा शिल्पकार असेल.माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, आसगांवकर सरांना शिक्षकांच्या प्रश्नांची चांगली जाणीव आहे. अरूण लाड हे कर्तबगार आहेत. वीज दरवाढीच्या आंदोलनात ते सहभागी होते. पदवीधरांचे प्रश्न सोडवतील यात शंकाच नाही. नवा भारत घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये आहे.प्रा.जयंत आसगांवकर म्हणाले, शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी मी उमेदवार आहे. यापूर्वी च्या आमदारांनी प्रश्न सोडवायला पाहिजे होते. मात्र निर्णय न झाल्यामुळे ते सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ, खासदार संजयदादा मंडलिक व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या नेतृत्वाखाली कागल तालुक्यातून उच्चांकी मताधिक्य देऊ.यावेळी दादा लाड, खंडेराव जगदाळे, विलास पोवार, शिवाजीराव चौगुले, भैय्या माने, सुनील माळी, राजेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमास एस.डी. लाड, राजू माने, शानाजी माने, सभापती पूनम मगदूम महाडिक, राजश्री माने, अशोक बुगडे, जी.एस. पाटील, बाबासाहेब चौगुले, एम.आर. चौगुले, एन.एस. पाटील, जीवनराव सावंत आदींसह कार्यकर्ते उपस्थित आहे.सुत्रसंचलन के.आर पाटील यांनी केले. आभार किरण पास्ते यांनी मानले.
कागलचे राजकीय विद्यापीठ……
बंटी पाटील म्हणाले, मतदार तीस सेकंदात बाहेर आला तर मतदाराने आपल्याला मतदान केले असे समजावे. मतदानानंतर लगेच समजेल. किती मते मिळाली. राजकारण शिकयासाठी कागलच्या विद्यापीठाचे मार्गदर्शन आम्ही घेतो.
Leave a Reply