
कागल : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात संसदेमध्ये अन्यायी विधेयक आणून अत्यंत गदारोळात अन्यायी विधेयक पास करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे *पाप मोदी सरकारने केले आहे. या विरोधात गेले दहा दिवस दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन अहोरात्र सुरू आहे त्या आंदोलनास पाठिंबा देण्याकरता आज कागल शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, भारतीय विद्यार्थी मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी, कागल शहर वनमित्र व महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांनी या बंद मध्ये सहभाग घेतला.भारत बंदच्या पार्श्वभूमीवर आज कागल येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा एसटी स्टँड येथून गैबी चौक पर्यंत पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
Leave a Reply