फुटकळांनी केलेल्या आरोपामुळे दादांचे महत्व कमी होणारे नाही:महेश जाधव

 

कोल्हापूर : नुकतीच झालेली पुणे पदवीधर निवडणुक भाजपाच्यावतीने भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. ५८ तालुक्यामध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मनापासून जीवाचे रान करून ही निवडणूक मोठ्या ताकदीने लढली आहे. भाजपा विरुद्ध तीन पक्ष अशा पद्धतीच्या झालेल्या या निवडणुकीत पराभव झाला असून राजकारणात हार-जीत होत राहणारच. भारतीय जनता पार्टी म्हणून प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांनी ५ जिल्ह्यांत प्रवास, मेळावे, गाटी-भेटी यासारख्या अनेक प्रयत्नाने ही निवडणूक मोठ्या ताकदीने लढली परंतु फक्त निवडणुकीचे निमित्य पुढे करून ज्यांना पक्षामध्ये कोणतेही फारसे महत्वाचे स्थान नाही अशा लोकांनी दादांचा राजीनामा मागणे म्हणजे हस्यास्पद आहे.गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रात ज्या काही निवडणुका झाल्या, अनेक मोठ्या नेत्यांचे प्रवेश, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यामधील विजय एकूणच भाजपाचा झेंडा गल्ली पासून दिल्ली पर्यंत नेण्यात या संपर्ण यशामध्ये दादांचा सिंहाचा वाटा नाकारता येणार नाही. सतत प्रवास करत संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाचे संघटन वाढण्यासाठी दादा सदैव प्रयत्नशील आहेत. भाजपाच्या विरोधातील सर्व पक्षांना खिळखिळी करण्याचे काम दादांनी केले आहे. ज्या झाडाला फळे येतात त्याच झाडाला दगडे मारली जातात या म्हणी प्रमाणे काहीही झाले तरी उठसूट दादांवर आरोप केले जातात यातून महाराष्ट्रात दादांचे स्थान किती मोठे आहे हेच दिसून येते. त्यामुळे या महराष्ट्रातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष पासून बूथ अध्यक्षापर्यंत सर्व दादांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. २ – ४ फुटकळांनी केलेल्या आरोपामुळे दादांचे महत्व कमी होणारे नाही. असे मनोगत भाजपा जिल्हा कार्यालय बिंदू चौक येथे झालेल्या भाजपा पदाधिकारी यांच्या बैठकीमध्ये भाजपा नेते महेश जाधव यांनी व्यक्त केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!