पर्यटनासाठी बांधा- बांधावर जाणारा मी नव्हे! ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

 

कागल:कोरड्या नदीत पाण्यासाठी खड्डे खोदलेला व उसात वाकुरी मारलेला मी जातिवंत शेतकरी आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. पर्यटनासाठी बांधा- बांधावर जाणारा मी न्हवे, असेही मुश्रीफ पुढे म्हणाले.कागल शहराकडून जाधव मळ्यातून करनुरकडे जाणाऱ्या पानंद रस्त्याच्या खडीकरण, रुंदीकरण, मजबूतीकरण व डांबरीकरण या कामाचा शुभारंभ कार्यक्रमात श्री. मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतुल जोशी होते.यावेळी करनूर पानंद, वंदूर पानंद, मौलाली मळा पानंद, करंजे पानंद, पसारेवाडी पानंद, आदी पानंदीच्या खडीकरण, रुंदीकरण, मजबुतीकरणासह डांबरीकरणाच्या साडेसहा कोटी कामांचा शुभारंभ श्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.यावेळी बोलताना मंत्री श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, १९७२  साली वडिलांच्या निधनानंतर थोरल्या बंधूंच्या नोकरीमुळे शेतीची जबाबदारी माझ्यावर पडली. महाविद्यालयीन शिक्षण करित मी दररोज शेतात जायचो. १९८० -८१ च्या दरम्यान  काळम्मावाडी धरण नव्हतं. त्यावेळी नदीत शेतीच्या पाण्यासाठी मी खड्डे खोदलेला व उसात वाकुरी मारलेला मी जातिवंत शेतकरी आहे. शेताकडे जाताना गुडघाभर चिखलातून गम बूट घालून वाट काढणे, हेही मी अनुभवल आहे, असेही ते म्हणाले. शेतीमध्ये उसासह कलिंगड, भाजीपाला, पपई असे नवनवीन प्रयोग करणारा मी शेतकरी होतो, असे सांगतानाच श्री मुश्रीफ म्हणाले नंतर राजकारणाचा नाद लागला आणि शेताकडे जाणं बंद झालं. आत्ता माझी पत्नी शेतीची जबाबदारी सांभाळते.यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, नगराध्यक्ष सौ. माणिक माळी, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, अतुल जोशी, पी. बी. घाटगे, नगरसेवक सतीश घाडगे, विवेक लोटे, बाबासाहेब नाईक सौ. शोभा लाड, सौ. माधवी मोरबाळे आदी प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!