भाजप जिल्हा सरचिटणीसपदी दत्तात्रय आवळे यांची नियुक्ती

 

कोल्हापूर: भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण पातळीवरील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी पक्षाच्या वतीने कार्यकारिणीची फेररचना करण्यात येत आहे. यामध्ये पक्षाच्या सरचिटणीसपदी दत्तात्रय पांडुरंग आवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीय आघाडीची जबाबदारी आवळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते आवळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
भारतीय जनता पक्षाच्या विचार ग्रामीण पातळीवर तळागाळात रुजावा, यासाठी पक्षाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून पक्षाची जिल्हा कार्यकारिणी बळकट केली जात आहे. नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी नियुक्तीमध्ये ६ उपाध्यक्ष, 2 सरचिटणीस तर ७ जणांची चिटणीसपदी नियुक्ती केली. एकूण ९० कार्यकर्त्यांची जम्बो कार्यकारिणी पक्षानं निर्माण केलीय. यामध्ये जिल्हा सरचिटणीस म्हणून दत्तात्रय पांडुरंग आवळे यांना स्थान देण्यात आलंय. अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीय आघाडीची जबाबदारी आवळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते आवळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या पदाच्या माध्यमातून समाजातील सर्वच स्तरातील घटकांना न्याय देण्यात येईल, अशी ग्वाही आवळे यांनी निवडीनंतर बोलताना दिली. यावेळी भगवान काटे, विठ्ठल पाटील, दीपक शिरगांवकर यांच्यासह पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!