सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात तीन लाख ६१ हजार साखर पोत्यांचे पूजन

 

सेनापती कापशी:सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या तीन लाख, ६१ हजार साखर पोत्याचे पूजन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. कारखाना कार्यस्थळावरील श्री दत्त मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचे उद्घाटन झाले.श्री दत्त मंदिर परसिर सुशोभिकरण उट्घाटनासह, या हंगामात उत्पादित ३ लाख ६१ हजार पोती पुजन,दोन कोटी १० लाख युनिट विज निर्यात टर्बाईन पुजन व एक कोटी ३३ हजार इथेनॉलकरारापैकी सात लाख लिटर्स इथेनॉल पुरवठा टॅकर्स पुजन अशा संयुक्त कार्यक्रमासाठी अध्यक्ष नवीद मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी बोलताना अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले, या हंगामाच्या ५८ दिवसात तीन लाख, ४५ हजार टन ऊस गाळपानंतर तीन लाख, ६१ हजार क्विटल साखर उत्पादित झाली आहे. सरासरी साखर उतारा १०.४६ टक्के असून बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीचा उतारा धरून एकूण सरासरी ११.९६ टक्के होतो. सध्या देशात वाढत चाललेल्या साखर उत्पादनाचा विचार करता बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मीतीचा निर्णय संस्थापक व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतलेला आहे.या हंगामात ९०.४७ युनिट विज निर्मीती प्रतीटन सरासरीने आजअखेर एकूण तीन कोटी १० लाख युनिट विजनिर्मीती केली आहे. त्यापैकी दोन कोटी १० लाख युनिट निर्यात केले आहेत.श्री.मुश्रीफ पुढे म्हणाले, पेटोलमध्ये १०% इथेनॉल मिसळण्याच्या शासनाच्या धोरणानुसार ऑईलकंपनीना एकूण एक कोटी ३३ हजार लिटर्स इथेनॉल पुरवठ्याचा करारआहे. आजअखेर सात लाख लिटर्स इथेनॉलचा पुरवठा केलेला आहे. पेट्रोलिअम कंपनीच्या इथेनॉल मागणी विचारात घेता डिस्टीलरी प्लॅन्टची क्षमता प्रतिदिनी ३०,००० लिटर्स वरुन प्रतिदिनी ५०,००० लिटर्स इतके विस्तारीकरण केले आहे.चालू हंगामामध्ये एकूण ३२ लाख, २५ हजार लिटर्स इतके अल्कोहोलचे उत्पादन घेतलेअसून त्यापैकी २१ लाख, २५ हजार लिटर्स रेक्टीफाईड स्पिरीट व ११ लाख लिटर्स इथेनॉलचे उत्पादन झाले आहे.तसेच डिस्टीलरीमधून निघणारे सांडपाणी (स्पेट वॉश) याची घनता वाढवून,बॉयलरला त्याचा इंधन म्हणून वापर केला आहे व त्यापासून निर्माण होणारी स्टीम हीपुन्हा डिस्टीलरीसाठी वापरलेली आहे. त्यामधून निघणारे कंन्डेंसेट याच्यावरती प्रकिया करुन निघणारे पाणी हे पुन्हा डिस्टीलरीकरीता वापरलेले आहे. यामुळे डिस्टीलरी प्रकल्पासाठी कमीत कमी पाण्याचा वापर करावा लागतो व कोणत्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही.ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकविलेल्या सर्वच्या सर्व ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहन अध्यक्ष श्री. मुश्रीफ यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!