
कोल्हापूर: कोल्हापूरचे भूषण स्व. श्रीपतराव शंकरराव बोंद्रेदादा यांचा जन्मशताब्दी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांच्या मौलिक कार्याचा आढावा घेतला. स्वातंत्र्य चळवळ, जिल्हा बँक अध्यक्ष, जिल्हा दूध संघ गोकुळ, रयत तालुका संघ उभारणी, नगराध्यक्ष, २३ वर्षे आमदार, कृषी राज्यमंत्री अशा विविध भूमिकेच्या माध्यमातून समाजातील सर्वच स्तरातील लोकांसाठी दादांचे योगदान अतुलनीय आहे. लोकमानसातील त्यांची ‘आपले दादा’ ही प्रतिमा अशी होती. कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच राज्यातील शेतकरी व कष्टकरी जनतेचा आवाज म्ह्णून त्यांनी केलेले काम हे वाखाणण्यासारखे आहे.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दादांनी लोकसंग्रह अफाट होता. दादांचा हा प्रवास माझ्या सारख्या हजारो कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी व स्फूर्तिदायी आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.त्यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
Leave a Reply