
सारस्वत बँक या भारतातील सर्वात मोठया अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने गृहकर्ज, कार कर्ज, मालमत्ता कर्ज व सोने तारण अशा प्रमुख कर्ज उत्पादनांवरील व्याजदर दि. १५ डिसेंबर २०२० पासून कमी केले आहेत. स्वस्तिक बोनान्झा योजनेअंतर्गत बँकेने कमी झालेल्या दरासह अतिरिक्त लाभ देखील सादर केले आहेत- जसे प्रक्रिया शुल्कांमध्ये सवलत,१०० टक्क्यांपर्यंतफायनान्स आणि मोफत NETC FASTag. हे कमी झालेले व्याजदर व अतिरिक्त लाभ यांचा फायदादि. ३१ मार्च २०२१ पर्यंत घेता येऊ शकतो.
अनु. क्र. | उत्पादने | व्याजदर* | अतिरिक्त लाभ* |
१ | गृहकर्ज | ७.०० %प्रतिवर्ष | प्रक्रिया शुल्क नाही |
२ | कार कर्ज | ८.०० %प्रतिवर्ष | १००% फायनान्स, मोफत FASTag |
३ | मालमत्ता कर्ज | ८.८० %प्रतिवर्ष | ५ कोटी रूपयांपर्यंत |
४ | सोने तारण | ८.५० %प्रतिवर्ष | प्रक्रिया शुल्क नाही |
५ | टू व्हीलर लोन | ११.०० %प्रतिवर्ष | १००% फायनान्स |
*नियम व अटी लागू
सध्या बाजारपेठेवर ओढावलेल्या आर्थिक मंदीची स्थिती शिथिल करण्यासाठी आणि ग्राहकांना त्यांच्या कर्जासंदर्भातील गरजा सुलभ व सोईस्कर करण्यामध्ये मदत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.नवीन वर्षात व्याजदरांमधील कपात निश्चितच ग्राहकांना त्यांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यामध्ये आणि आर्थिक स्थिरता आणण्यामध्ये लाभदायी ठरेल.दसरा व दिवाळी यासारख्या सणोत्सवांचा ग्राहकांना लाभ घेता यावा यासाठी ऑक्टोबरच्या सुरूवातीलाच बँकेने आपल्या काही कर्ज उत्पादनांचे व्याजदर, प्रक्रिया शुल्क, मार्जिन इत्यादी सारख्या प्रमुख घटकांवर सूट दिली. महामारीमुळे सुरू असलेल्या आर्थिक मंदीमधून ग्राहकांना काहीसा दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले.प्रतिष्ठित फोर्ब्स मासिकाने केलेल्या‘वर्ल्डस् बेस्ट बँक्स २०२०‘सर्वेक्षणामध्ये बँकेचा भारतातील दुसरी सर्वोत्तम बँक म्हणून सन्मान करण्यात आल्याने बँकेच्या शिरपेच्यात आणखी एका तुऱ्याची भर पडली आहे.
Leave a Reply