
कोल्हापूर : शिवसेना नेते व महाराष्ट्र राज्यांचे नगरविकासमंत्री नाम. एकनाथ शिंदे शुक्रवार दि.०८ जानेवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, त्यांच्या दौऱ्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या धर्तीवर शिवसैनिकांसह युवा सैनिकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण तयार झाले आहे. नगरविकासमंत्री नाम.श्री.एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यातून शहरात भगवे वातावरण निर्माण करण्याची जय्यत तयारी शिवसेना आणि युवा सेनेच्या पदाधिकार्यांनी केली होती. शहरात ठिकठिकाणी होर्डिंग, भगवे झेंडे यामाध्यमातून शिवसेनेचे वातावरण करण्यात आले. सकाळी कोल्हापूर शहर शिवसेनेच्यावतीने त्यांचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. यासह सायंकाळी शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ येथे बृहन्मुंबई महापालिकेचे क्षेत्र वगळता उर्वरित सर्व महानगरपालिका, नगरपालिका, प्रादेशिक नगररचना इ.क्षेत्राकरिता एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) संपूर्ण राज्याकरिता लागू केल्याबद्दल कोल्हापूर शहर शिवसेनेच्यावतीने नाम.श्री.एकनाथजी शिंदे यांचा चांदीची तलवार, शाल, श्रीफळ देवून जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी भगवे फेटे परिदान केलेल्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी भागातील वातावरण भगवेमय केले.
Leave a Reply