
कोल्हापूर :शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन कटिबध्द आहे. शेतकऱ्यांना अखंडित व दर्जेदार वीज पुरवठा मिळावा या हेतूने ऊर्जा मंत्री मा.नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने कृषी पंप वीज जोडणी धोरण 2020 अंतर्गत जाहीर केले आहे. ग्रामीण भागातील वीज वितरणाचे जाळे अधिक सक्षम करण्याची शासनाची भुमिका आहे. शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळावी यासाठी कालमर्यादित कार्यक्रम शासनाने घोषित केला आहे. या धोरणानुसार पहिल्या टप्प्यात 1 एप्रिल 2018 नंतर पैसे भरून प्रलंबित असलेल्या व लघुदाब वाहिनीपासून 30 मीटरच्या आत अंतर असलेल्या कृषीपंपाना 26 जानेवारी पर्यंत वीज जोडणी देण्याचे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी महावितरणचे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे यांना दिले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात 1 एप्रिल 2018 नंतर पैसे भरून प्रलंबित 5 हजार 965 कृषी पंप वीजजोडण्या आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात लघुदाब वाहिनीपासून 30 मीटरच्या आत अंतर असलेल्या 1 हजार 432 कृषीपंपाना वीजजोडणी दिली जाणार आहे. उर्वरीत शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने वीज जोडण्या देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील सांगितले.
Leave a Reply